अवघ्या 60 हजारात खरेदी करा 74 kmpl मायलेज देणारी बाईक

बाईक खरेदी करताना आपल्या मनात पहिला विचार येतो की ही बाईक किती मायलेज देईल. पेट्रोलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता बाईक खरेदी करताना मायलेजचा विचार सर्वात आधी केला जातो.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:23 PM, 24 Feb 2021
अवघ्या 60 हजारात खरेदी करा 74 kmpl मायलेज देणारी बाईक
TVS sport

मुंबई : बाईक खरेदी करताना आपल्या मनात पहिला विचार येतो की ही बाईक किती मायलेज देईल. पेट्रोलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता बाईक खरेदी करताना मायलेजचा विचार सर्वात आधी केला जातो. आज आम्ही तुम्हाला अशाच कमी किंमत आणि जास्त मायलेज देणाऱ्या एका बाईकची माहिती देणार आहोत. (TVS 60 thousand rupees bike will give 74 kmpl mileage)

भारतात एखादी व्यक्ती ऑफिसला/कॉलेजला जाण्यासाठी किंवा दररोज बराच वेळ प्रवास करत असेल तर त्याला एक अशी बाईक हवी असते जी उत्कृष्ट मायलेज देईल, सोबतच त्या वाहनाची किंमत देखील कमी असेल. किफायतशीर किंमतीत अधिक मायलेज देणाऱ्या बाईक्स हल्ली प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाची गरज बनली आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासमोर एक बाईक घेऊन आलो आहोत जी तुमच्या बजेटमध्ये बसेल आणि ती चांगलं मायलेजदेखील देईल. टीव्हीएस स्पोर्ट (TVS Sport) असं या बाईकचं नाव आहे.

टीव्हीएस स्पोर्टची सर्वात खास गोष्ट म्हणजे, या बाईकबाबत कंपनीने असा दावा केला आहे की, ही बाईक 74 किलोमीटर प्रतिलिटर इतकं मायलेज देते. या बाईकचं टॉप स्पीड 90 किमी प्रतितास इतकं आहे. या बाईकमध्ये तुम्हाला 99.7 सीसी चं 4 स्ट्रोक सिंगल सिलिंडर एअर कूल्ड इंजिन देण्यात आलं आहे, जे फ्यूल इंजेक्शन तंत्रज्ञानासह काम करतं.

दमदार फीचर्स

या बाईकचं इंजिन 7350 आरपीएम वर 8.1 बीएचपी इतकी मॅक्सिमम उर्जा आणि 4500 आरपीएम वर 8.7 Nm एनएमची पीक टॉर्क जनरेट करते. टीव्हीएस स्पोर्टचे (TVS Sport) इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. बाईकची लांबी 1950 मिलिमीटर, रुंदी 705 मिलीमीटर आणि उंची 1080 मिलीमीटर इतकी आहे तर व्हीलबेस 1236 मिलीमीटर आणि ग्राउंड क्लीयरन्स 175 मिलीमीटर इतका आहे. टीव्हीएस स्पोर्टच्या पुढच्या बाजूला 130 मिमी ड्रम ब्रेक आहे. तर मागील बाजूस 110 मिमी ड्रम ब्रेक देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी मागीला बाजूस CBS फीचर देण्यात आले आहे.

किफायतशीर किंमत

या बाईकमध्ये 10 लीटर क्षमतेची पेट्रोल टाकी देण्यात आली आहे. या बाईकच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक ऑईल डॅम्ड सस्पेंशन देण्यात आलं आहे. त्याच वेळी, बाईकच्या मागील बाजूस 5-स्टेप एडजस्टेबल हायड्रॉलिक शॉक अब्जॉर्बर सस्पेंशन देण्यात आलं आहे. टीव्हीएस स्पोर्टच्या किक स्टार्ट अलॉय व्हील व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 56,100 रुपये आहे. तर या बाईकच्या सेल्फ-स्टार्ट अ‍ॅलोय व्हील व्हेरिएंटची किंमत 62,950 रुपये इतकी आहे.

इतर बातम्या

केवळ 51000 रुपयात घरी न्या 83KM मायलेज देणारी मोटारसायकल

(TVS 60 thousand rupees bike will give 74 kmpl mileage)