जुनी कार विकायचीये? मग करा हे काही सोपे उपाय, फूल पैसा वसूल
जुनी कार विकायची? पैसाही अधिक आला पाहिजे का? मग चिंता करू नका. आम्ही तुम्हाला असे काही मार्ग सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला जुन्या कारची चांगली किंमत मिळेल.

तुम्ही घरातील जुनी कार विकण्याचा विचार करत आहाता का? तुम्ही नवीन कार खरेदी करण्याच्या मूडमध्ये असाल आणि तुमची जुनी कार विकू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला असे काही मार्ग सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला जुन्या कारची चांगली किंमत मिळेल. हो. आम्ही तुम्हाला खाली विस्ताराने काही पद्धती सांगणार आहोत, ज्या माध्यमातून तुम्ही जुनी कार विकू शकतात.
अनेकदा असं होतं की, जेव्हा तुम्ही तुमची जुनी कार कुणाला विकता तेव्हा समोरचा व्यक्ती म्हणतो की, ती जुनी आहे, त्याचं इंजिन चांगलं नाही. सगळे बहाणे किंवा कारणं देऊन समोरील वक्ती तुमची गाडी स्वस्तात विकत घेतो किंवा जुनी गाडी घेणं टाळतो. असं होऊ नये, यासाठी खालील माहिती जाणून घ्या.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशातील सेकंड हँड कारची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. वाढती महागाई, पेट्रोलच्या दरात सातत्याने होणारी वाढ हे यामागचे कारण असल्याचे बोलले जात आहे. तुम्हालाही तुमची कार विकायची असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला कारची चांगली किंमत मिळेल.
कारची देखभाल करा
आपण आपली कार एखाद्या व्यक्तीला, डीलरला विकू शकता किंवा एजन्सीला परत देऊ शकता. गाडीच्या लूकवरूनच पहिला निर्णय होतो, असंही म्हणता येईल. कार खरेदीदाराच्या मनात गाडीचा लूक पाहून एक इमेज तयार होते. याद्वारे तो ती विकत घेण्याचा निर्णय घेतो. त्यामुळे आपल्या कारचे इंटिरिअर आणि एक्सटीरियर दोन्ही सांभाळणे सर्वात महत्वाचे आहे. यामुळे तुम्हाला तुमची कार विकून चांगले पैसे मिळू शकतात.
वेळोवेळी सर्व्हिसिंग करा
गाडीची वेळोवेळी सर्व्हिसिंग केली पाहिजे. इंजिन ऑईल, कूलंट टॉप-अप, फ्यूल फिल्टरमध्ये बदल करावा. यामुळे गाडीची स्थिती चांगली राहते. त्यामुळे चांगला भाव मिळण्याची शक्यता वाढते.
स्क्रॅचकडे दुर्लक्ष करू नका
अनेकदा आपण कारवरील किरकोळ स्क्रॅचकडे दुर्लक्ष करतो, ज्यामुळे कारचा एक्सटीरियर खराब होतो आणि जेव्हा आपण कार विकायला जातो तेव्हा स्क्रॅचमुळे किंमत कमी होते. त्यामुळे लहान खड्डे तातडीने दुरुस्त करून घ्या.
आम्ही तुम्हाला वर जुन्या कारची देखभाल कशी करायची, ती विकावी यासाठी काय काळजी घ्यायची, याची सविस्तर महिती सांगितली आहे. आता तुम्ही वरील माहितीनुसार तुमची जुनी कार चांगली ठेवू शकतात. याचा फायदा तुम्हाला असा होईल की, ही जुनी कार काहीना काही पैसे देऊन जाईल आणि नव्या गाडीला थोडा हातभार लागेल.
