AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थंडीच्या दिवसांत कार सुरू करायला येते समस्या, या सोप्या टिप्स लक्षात ठेवा

कार सुरू होत नसल्यास, तुम्ही दुसरी कार बॅटरी किंवा कार जंक्शन वापरू शकता. याच्या मदतीने कारच्या स्टार्टर मोटरला पुरेसा विद्युत प्रवाह मिळू शकेल. यानंतरही गाडी सुरू झाली नाही, तर गाडीचे इंजिन गरम होईल अशी काही व्यवस्था करा आणि मगच गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करा. 

थंडीच्या दिवसांत कार सुरू करायला येते समस्या, या सोप्या टिप्स लक्षात ठेवा
कार Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 22, 2023 | 4:25 PM
Share

मुंबई : सणासुदीचा काळ येऊन ठेपला असून आता हिवाळा येणार आहे. अनेक भागात थंडीने दार ठोठावले आहे. तुमच्या लक्षात आले असेल की, पेट्रोल-डिझेल गाड्यांना हिवाळ्यात काही वेळा सुरू होण्यास त्रास होतो. जरी, हे बहुतेक डिझेल कारमध्ये घडते परंतु हे पेट्रोल कारमध्ये देखील होऊ शकते. कार सुरू करण्यात समस्या (Car Start Problem) येण्याची अनेक कारणे असू शकतात आणि ती रोखणे देखील शक्य आहे. तर, अशा समस्यांमागील कारणे आणि त्यांना कसे टाळता येईल याबद्दल आपण जाणू घेऊया.

हिवाळ्यात कार सुरू करण्यात अडचण येण्याची कारणे

थंडीमुळे इंजिन तेल घट्ट होते. यामुळे इंजिनच्या पिस्टनला सिलिंडरमध्ये वर-खाली करण्यासाठी अधिक जोराची आवश्यकता असते. यामुळे स्टार्टर मोटरवर दबाव वाढतो. थंडीमुळे बॅटरीची क्षमताही कमी होते. यामुळे, काही वेळा स्टार्टर मोटरला पुरेसा विद्युत प्रवाह मिळत नाही. त्यामुळे गाडी सुरू करण्यातही अडचण येते. थंडीमुळे इंधनाचे ज्वलन योग्य प्रकारे होत नाही. यामुळे इंजिन सुरू होण्यास अधिक वेळ लागतो. ही समस्या पेट्रोल कारपेक्षा डिझेल कारमध्ये जास्त आढळते.

हिवाळ्यात कार सुरू करताना त्रास टाळण्याचे मार्ग

तुमच्या कारची बॅटरी वेळोवेळी तपासा. बॅटरीची चार्जिंग पातळी नेहमी 12.6 व्होल्टच्या वर असावी. म्हणून, हिवाळा सुरू होण्यापूर्वी, बॅटरी तपासा आणि आवश्यक असल्यास, ती बदलून घ्या. हिवाळ्यात उघड्यावर कार पार्क करू नका. त्यामुळे थंडीमुळे गाडीच्या इंजिन आणि बॅटरीवर अधिक परिणाम होतो. हे टाळले पाहिजे. झाकलेल्या शेडमध्ये कार पार्क करा.

कार सुरू होत नसल्यास, तुम्ही दुसरी कार बॅटरी किंवा कार जंक्शन वापरू शकता. याच्या मदतीने कारच्या स्टार्टर मोटरला पुरेसा विद्युत प्रवाह मिळू शकेल. यानंतरही गाडी सुरू झाली नाही, तर गाडीचे इंजिन गरम होईल अशी काही व्यवस्था करा आणि मगच गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करा.

कार वापरून झाल्यानंतर बंद करण्याआधी थोडी रेस करावी यामुळे कारमधले कार्बन कमी होते. पुढच्यावेळी कार सुरू करतांना तुम्हाला त्रास जाणार नाही.

Follow Us
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...