Inflation : इंधनाचे दर कमी करू शकत नसलो तरी, दुचाकीचा मायलेज नक्कीच वाढवू शकतो… जाणून घ्या कसे  

| Updated on: May 17, 2022 | 2:21 PM

चांगल्या मायलेजसाठी जवळपास सर्वच दुचाकींना इकॉनॉमी मोड देण्यात येत असतो. परंतु बहुतेक लोक याचा वापर करताना दिसून येत नाहीत.

Inflation : इंधनाचे दर कमी करू शकत नसलो तरी, दुचाकीचा मायलेज नक्कीच वाढवू शकतो... जाणून घ्या कसे  
दुचाकीचा मायलेज नक्कीच वाढवू शकतो
Image Credit source: social
Follow us on

मुंंबई : पेट्रोलचे दर दररोज नवनवीन उच्चांक गाठताना दिसत आहे. हे दर कधीच शंभरीपार गेलेले आहेत. पेट्रोलचे दर वाढल्याने एकंदर सर्वच महागाइ (Inflation) वाढली आहे. परंतु निदान इंधनाच्या माध्यमातून तुमच्या खिशाला कमी झळ बसावी यासाठी आम्ही काही खास टिप्स सांगणार आहोत. या माध्यमातून तुम्ही तुमच्या दुचाकीचा मायलेज (mileage) काही अंशी वाढवू शकणार आहात. दुचाकी (bike) खरेदी करीत असताना आपण नेहमी तिच्या मायलेजचा विचार करीत असतो. कारण दुचाकीने चांगला मायलेज न दिल्यास पेट्रोल जास्त लागत असते. आधीच इंधनाचे दर वाढले अन्‌ त्यात दुचाकीने मायलेज न दिल्यास ग्राहकांना दुहेरी भुर्दंड सोसावा लागत असतो. त्यामुळे मायलेज वाढविणाऱ्या पाच टिप्स पाहू या…

  1. दुचाकीची नियमित सर्व्हिसिंग करावी : मायलेज कमी होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे दुचाकी नियमित सर्व्हिसिंग न करणे. बाइकमध्ये इंजिन ऑइलसोबत अनेक अशा गोष्टी असतात, ज्यांना वेळो वेळी बदलने आवश्यक ठरत असते. त्यामुळे नियमित सर्व्हिसिंग करणे आवश्यक ठरत असते.
  2. कार्बोरेटरवर लक्ष द्यावे : दुचाकी सर्व्हिसिंग केल्यानंतही ती मायलेज देत नसेल तर तिच्या कार्बोरेटर सेटींग्समध्ये बदल करण्याची आवश्यकता असते. कार्बोरेटरची इलेक्ट्रकली आणि म्यॅन्यूअली सेटींग्स बदलने गरजेचे असते.
  3. हे सुद्धा वाचा
  4. टायरचे प्रेशर तपासा : दुचाकीचा चांगला मायलेज मिळावा यासाठी तिच्या चाकांवरही लक्ष केंद्रीत करणे आवश्यक असते. दुचाकीच्या टायरमध्ये हवा कमी असल्यास इंजीनवर जास्त दबाव पडत असतो. त्यामुळे ती योग्य पध्दतीने धावू शकत नाही व कमी मायलेज मिळतो.
  5. रॅश ड्रायव्हिंग करु नका : अनेकदा लोक खासकरुन युवक रस्त्यांवर रॅश ड्रायव्हिंग करीत असल्याचे दिसून येते. यातून केवळ जिवीताचा धोकाच नाही तर दुचाकीचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. याचा दुचाकीच्या मायलेजवर वाइट परिणाम होत असतो.
  6. इकॉनॉमी मोडवर ड्रायव्हिंग करावी : चांगल्या मायलेजसाठी जवळपास सर्वच दुचाकींना इकॉनॉमी मोड देण्यात येत असतो. परंतु बहुतेक लोक याचा वापर करताना दिसून येत नाहीत. परंतु या माध्यमातूनही तुम्ही चांगला मायलेज मिळवू शकतात.