Yamaha R3 Vs TVS Apache RR 310 : यामाहा की, टीवीएस, कुठली बाईक विकत घेण्यात जास्त फायदा?

Yamaha R3 Vs TVS Apache RR 310 : भारतीय बाजारपेठेत सुपरस्पोर्ट सेगमेंटमध्ये बाइक्सची खूप डिमांड आहे. अशी मोटरसायकल विकत घेणं अनेकांच स्वप्न असतं. Yamaha R3 आणि TVS Apache RR 310 या सेगमेंटमध्ये येणाऱ्या दोन पॉपुलर बाइक आहेत. तुम्ही या दोन बाइकपैकी एक विकत घेण्याचा विचार करत असाल, तर जाणून घ्या कुठली जास्त चांगली बाइक आहे.

Yamaha R3 Vs TVS Apache RR 310 : यामाहा की, टीवीएस, कुठली बाईक विकत घेण्यात जास्त फायदा?
Yamaha R3 Vs TVS Apache RR 310
Follow us
| Updated on: Dec 20, 2023 | 6:34 PM

Yamaha R3 Vs TVS Apache RR 310 : यामाहाने नुकतीच नवीन मोटरसायकल Yamaha R3 लॉन्च केली. त्याची किंमत 4.64 लाख रुपये आहे. ही एक सुपरस्पोर्टी बाइक आहे. 350 सीसी इंजिन असलेल्या सेगमेंटमध्ये ही मोटरसायकल येते. भारतीय बाजारपेठेत Yamaha R3 चा थेट मुकाबला TVS Apache RR 310 मॉडेलशी आहे. ज्याची शोरुम प्राइस 3 लाख रुपयापेक्षा कमी आहे.

Yamaha R3 मध्ये डुअल LED हेडलॅप, स्प्लिट टाइप सीट्स, क्लिप ऑन हँडलबार, डिजिटल LCD क्लस्टर, साइड माउन्ट एग्जॉस्ट, विंडस्क्रीन, स्लीक LED टेललाइट आहे. तेच TVS Apache RR 310 मध्ये मस्कुलर फ्यूल टँक, फुल फेयरिंग, ब्लूटूथ कनेक्टिविटी, 5.0 इंचाचा कलर्ड इंस्ट्रूमेंट क्लस्टर, LED लायटिंग आणि डुअल प्रोजेक्टर हेडलॅप यूनिट येतं.

Yamaha R3 Vs TVS Apache RR सेफ्टी

यामाहाच्या या बाइकमध्ये एंटी ब्रेकिंग सिस्टम, चार रायडिंग मोड्स आणि राइड-बाय-वायर थ्रोटल फीचर देण्यात आलय. सस्पेंशन ड्यूटीसाठी यात इनवर्टेड फ्रंट फोर्क्स आणि रियर मोनो शॉक यूनिट देण्यात आलय. अपाचे बाइकमध्ये राइड-बाय-वायर थ्रोटल, रायडिंग मोड्स, दोन्ही व्हील्सवर डिस्क ब्रेकिंग सिस्टम आणि डुअल चॅनल ABS फीचर देण्यात आलय.

Yamaha R3 Vs TVS Apache RR: इंजिन

इंजिनच्या बाबतीत यामाहाची बाइक जास्त पावरफुल आहे. R3 मॉडलमध्ये 321 सीसी लिक्विड कूल्ड, पॅरलल-ट्विन DOHC इंजिन देण्यात आलय. हे 41.4bhp पावर आणि 29.5Nm पीक टॉर्क जनरेट करत. ट्रान्समिशन हँडलिंगसाठी यात 6-स्पीड गियरबॉक्स देण्यात आलाय.

Apache RR 310 मध्ये 312 सीसी सिंगल-सिलेंडर, लिक्विड कूल्ड इंजिन दिलय. हे 34bhp पावर आणि 27.3Nm टॉर्क जनरेट करत.

Yamaha R3 Vs TVS Apache RR : कुठली बाइक घेण योग्य?

TVS Apache RR 310 ला फक्त 2.72 लाख रुपयात (एक्स-शोरूम) विकत घेता येऊ शकतं. तेच Yamaha R3 ची किंमत 4.64 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. आमच्या हिशोबाने कमी किंमतीत चांगले फिचर्स असलेली Apache RR 310 विकत घेणं केव्हाही चांगल ऑप्शन आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.