Banking Budget 2021: दोन सरकारी बँका विकणार; सीतारामन यांची मोठी घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प मांडला. (nirmala sitharaman a big announcement for insurance companies and banking sector)

Banking Budget 2021: दोन सरकारी बँका विकणार; सीतारामन यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प मांडला. कोरोना संकटानंतरचा हा पहिला अर्थसंकल्प होता. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंहोतं. केंद्र सरकार आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी काय करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकार दोन सरकारी बँका विकणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी आज केली. (nirmala sitharaman a big announcement for insurance companies and banking sector)

निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. एका विमा कंपनीचं खासगीकरण करण्यात येईल. त्याशिवाय दोन सरकारी बँकांचे खासगीकरण करण्यात येईल किंवा त्या विकल्या जातील. तसेच सरकारी कंपन्यांचे अतिरिक्त भूखंडही विकले जाणार आहेत. तसेच सरकार आयडीबीआय बँकेचेही खासगीकरण करणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी केली आहे.

एलआयसीत आयपीओ

यावेळी त्यांनी एलआयसीत आयपीओ आणणार असल्याचंही जाहीर केलं. एलआयसीत आयपीओ आणल्यानंतर शेअर्स विकण्यात येईल, असं सीतारामन म्हणाल्या. सरकारने विमा कंपनीत परदेशी गुंतवणूक करण्यासही परवानगी दिली आहे. एफडीआयची मर्यादा आता 74 टक्के करण्यात आली आहे. ही मर्यादा आधी 49 टक्के होती. त्याशिवाय बँकेची रखडलेली कर्ज प्रकरणे मार्गी लावण्यासाठी बॅड बँकेची स्थापना करण्यात येणार आहे.

सर्व काही विकायला ओएलएक्स आहे का?

दरम्यान, डाव्या पक्षांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकारने विमा, रेल्वे, संरक्षण, स्टील, बँक आणि सर्व काही विक्रीला काढलं आहे. हे बजेट आहे की ओएलएक्स आहे? असा सवाल डावे नेते मोहम्मद सलीम अली यांनी केला आहे. तर हे बजेट भांडवलदार धार्जिणं असल्याची टीका सीपीएम महासचिव सीताराम येचुरी यांनी केली आहे.

काँग्रेसने उडवली खिल्ली

केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर मला एका गॅरेजच्या मॅकेनिकची गोष्ट आठवते. तुमच्या गाडीचा मी ब्रेक दुरुस्त करू शकलो नाही. त्यामुळे तुमच्या गाडीच्या हॉर्नचा आवाज वाढवून दिला आहे, असं हा मॅकेनिक सांगत असतो. केंद्र सरकारचा बजेट असाच काहीसा आहे, अशा शब्दात काँग्रेस नेते शशी थरुर यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाची खिल्ली उडवली आहे. (nirmala sitharaman a big announcement for insurance companies and banking sector)

 

संबंधित बातम्या:

Union Budget 2021 Marathi LIVE :पेट्रोलची शंभरी निश्चित, डिझेलही भडकणार, अर्थमंत्र्यांची सेसची मोठी घोषणा

Budget 2021: सोने-चांदी, चप्पल स्वस्त होणार; मोबाईल, चार्जर, विदेशी कपडे, इलेक्ट्रिक वस्तू महागणार

Budget 2021-22 : सोने-चांदीचे दर घटणार, मोबाईल पार्ट्स महागणार, काय स्वस्त काय महाग?

(nirmala sitharaman a big announcement for insurance companies and banking sector)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI