Budget 2021 | 75 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना टॅक्स देण्याची गरज नाही !

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी करदात्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार आता 75 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या जेष्ठ नागरिकांना कर रचनेतून मोठी सूट देण्यात आली आहे.

Budget 2021 | 75 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना टॅक्स देण्याची गरज नाही !
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 1:30 PM

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या काळात शेती, उद्योग, व्यापार अशा सर्वच क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. संपूर्ण जग या महामारीच्या संकटातून जात आहे. अशावेळी सर्वांच्या नजरा भारतावर आहेत. अशा संकटाच्या काळात आपण आपल्या करदात्यांना काही सवलत द्यायला हवी, असं म्हणत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी करदात्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार आता 75 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या जेष्ठ नागरिकांना कर रचनेतून मोठी सूट देण्यात आली आहे.(Tax exemption for senior citizens above 75 years of age)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खास घोषणा केली आहे. त्यानुसार 75 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आता करातून सूट देण्यात आली आहे. आता 75 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ITR म्हणजे प्राप्तीकर विवरणपत्र भरावा लागणार नाही. त्यांच्या बँक खात्यातूनच प्राप्तीकराची रक्कम घेतली जाणार आहे. दरम्यान, हा लाभ फक्त पेन्शनधारकांना मिळणार आहे.

अर्थमंत्र्यांच्या या घोषणेमुळे जेष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण दरवर्षी प्राप्तीकर विवरणपत्र भरण्यासाठी कराव्या लागणाऱ्या धावपळीतून त्यांनी आता सुटका होणार आहे. यावर्षी कोरोना संकटामुळे प्राप्तीकर भरण्यासाठी अनेक अडचणी आल्या होत्या. प्रामुख्यानं ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडता येत नव्हतं. त्यामुळे सातत्याने मुदतवाढ द्यावी लागत होती.

गृहकर्जात दीड लाखापर्यंत सूट

सर्वांना घराची सुविधा किंवा किरायाने घर उपलब्ध होण्यासाठी गृहकर्जात दीड लाख रुपयांपर्यंत सूट देण्यात आली होती. ती सुविधा आता एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. जुलै 2019 मध्ये दीड लाखाच्या व्याजावर करात सवलत दिली होती. जर तुम्ही घर खरेदी करणार असाल आणि मार्च 2022 पर्यंत त्यासाठी कर्ज घेणार असाल तर त्यावरही तुम्हाला सूट दिली जाणार आहे.

PF उशिरा जमा केल्यास कपात नाही

त्याचबरोबर अर्थमंत्र्यांनी घोषणा केली आहे की, PF उशिरा जमा केल्यावर कुठलिही कपात केली जाणार नाही. त्याचबरोबर डिव्हिडेंटवरही कर हटवण्यात आला आहे. त्यामुळे लोकांना याचा फायदा होईल. त्याचबरोबर अनेक करांमध्ये सवल देण्यात आल्याचंही अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. टॅक्स प्रणाली अधिक सोपी बनवण्यासाठी अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. NRI लोकांना कर भरण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र यावेळी त्यांना डबल टॅक्स सिस्टिममधून सूट देण्यात येत असल्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

Banking Budget 2021: कर्ज बुडव्यांच्या वसुलीसाठी बॅड बँकेची घोषणा; कशी काम करणार बॅड बँक?

Budget 2021: बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळमध्ये इकनॉमिक कॉरिडोअर; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बंपर घोषणा!

Tax exemption for senior citizens above 75 years of age

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.