AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2025 : मोदी 3.0 सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प येथे पाहा, केव्हा आणि किती वाजता सादर होणार बजेट? जाणून घ्या अपडेट

Budget 2025 Live Streaming : आज, अर्थात 1 फेब्रुवारी रोजी मोदी 3.0 सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पाविषयी सर्वांना उत्सुकता आहे. बजेट तुम्हाला कुठे आणि कधी पाहायला मिळणार, हे जाणून घ्या एका क्लिकवर...

Budget 2025 : मोदी 3.0 सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प येथे पाहा, केव्हा आणि किती वाजता सादर होणार बजेट? जाणून घ्या अपडेट
बजेटची बाराखडी
| Edited By: | Updated on: Feb 01, 2025 | 8:27 AM
Share

देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प, आज (1 फेब्रुवारी) सादर होईल. मोदी 3.0 सरकारच्या या बजेटकडे उद्योजक, व्यावसायिकांपासून ते सर्वसामान्यापर्यंत सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आज 8 व्यांदा देशाचे बजेट सादर करतील. केंद्रीय अर्थमंत्री आज सकाळी 11 वाजता बजेट सादर करतील. या अर्थसंकल्पाविषयी सर्वांना उत्सुकता आहे. सगळ्यांचे तिकडे लक्ष लागले आहे.  बजेट तुम्हाला कुठे आणि कधी पाहायला मिळणार, हे जाणून घ्या एका क्लिकवर…

इथे पाहा LIVE अर्थसंकल्प

गेल्यावर्षी दोनदा अर्थसंकल्प सादर

गेले वर्ष हे निवडणुकीचे वर्ष होते. लोकसभा निवडणूक असल्याने दोनदा बजेट सादर झाले. केंद्रीय अर्थंमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थसंकल्प सादर केला होता. तर लोकसभा निवडणुकीपूर्वी 23 जुलै 2024 रोजी 2024-25 या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. लोकसभा निवडणुकीत एनडीए पुन्हा सत्तेत आली. आता दोन दिवसांनी पूर्ण बजेट सादर होणार आहे.

येथे पाहा देशाचा अर्थसंकल्प

तुम्ही देशाचा अर्थसंकल्प विविध प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. निर्मला सीतारमण यांचे अर्थसंकल्पीय भाषणाचे थेट प्रक्षेपण नेहमीप्रमाणे डीडी न्यूजवर पाहता येईल. याशिवाय डीडी नॅशनलवर सुद्धा अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण होईल. आता स्मार्टफोन एजच्या जमान्यात तुमच्या मोबाईलवर तुम्ही डीडी न्यूजच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरही केंद्रीय अर्थसंकल्प पाहू शकता.

संसद टीव्ही

दूरदर्शन प्रसारण

संसद टीव्ही आणि दूरदर्शनचे YouTube चॅनल थेट प्रवाह

अर्थ मंत्रालयाची अधिकृत वेबसाइट थेट पाहा

Tv9 मराठीच्या अधिकृत वेबसाइट आणि यूट्यूब चॅनेलवर तुम्ही बजेट लाईव्ह पाहू शकता.

टीव्ही९ मराठी लाइव्ह टीव्ही – https://www.tv9marathi.com/live-tv

टीव्ही9 मराठी वेब साईट – https://www.tv9marathi.com/

टीव्ही9 मराठी वेब साईट बजेट पेज – https://www.tv9marathi.com/budget

याठिकाणी बजेट वाचा PDF

केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये काय घोषणा केल्या. काय स्वस्त झाले, काय महाग झाले. कोणता कर कमी झाला, कोणता कर वाढला याचा सर्व तपशील सरकार, त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करते. www.indiabudget.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नागरिकांना बजेट हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असेल. नागरिकांना बजेट दस्तऐवज तिथे पाहू शकाल. हे PDF स्वरूपात उपलब्ध असतील, जे तुम्ही डाउनलोड, पाहू आणि वाचू शकता.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.