AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Union Budget 2023 Live : भांडवली खर्चासाठी अर्थसंकल्पात 10 लाख कोटींची तरतूद, रेल्वे, रस्ते यासह महत्त्वाच्या क्षेत्रात खासगी गुंतवणुकीवर भर

त्याचबरोबर दरडोई उत्पन्न 1.97 लाख रुपये वार्षिक झाले आहे. भारतीय अर्थव्यवस्था अधिक मजबूत झाली आहे, त्याचा परिणाम लोकांच्या राहणीमानावर दिसत आहे.

Union Budget 2023 Live : भांडवली खर्चासाठी अर्थसंकल्पात 10 लाख कोटींची तरतूद, रेल्वे, रस्ते यासह महत्त्वाच्या क्षेत्रात खासगी गुंतवणुकीवर भर
Finance Minister Nirmala Sitharaman all set to present the Union Budget 2023 at 11am today Image Credit source: tv9marathi
| Updated on: Feb 01, 2023 | 11:54 AM
Share

मुंबई : भांडवली खर्चासाठी अर्थसंकल्पात (Budget 2023) 10 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे, रस्ते यासह महत्त्वाच्या क्षेत्रात खासगी गुंतवणुकीवर आजच्या अर्थसंकल्पात (Union Budget 2023 live) भर देण्यात आला आहे. त्यासह 157 नवीन नर्सिंग कॉलेज उघडण्यात येणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सितारामन (budget speech live) यांनी जाहीर केलं आहे. त्याचबरोबर 2014 नंतर 157 नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात आली आहेत असंही अर्थमंत्र्यांनी भाषणात सांगितलं

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिल्ट्स लवकरच स्थापन करण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण महिलांसाठी 81 लाख बचत गटांना मदत मिळेल, त्यात आणखी वाढ करण्यात येणार आहे. केवळ आर्थिक मदतच केली नाही तर त्यांची तांत्रिक कौशल्ये सुधारण्यावर भर देण्यात आला आहे.

28 महिन्यांत 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्यात आल्याचं सुध्दा अर्थमंत्र्यांनी सांगितलं. केंद्र सरकारने कोविड लसीचे 220 कोटी डोस उपलब्ध केले. त्यापैकी 44.6 कोटी लोकांना ते पीएम सुरक्षा आणि पीएम जीवन ज्योती योजनेतून लोकांना देण्यात आले. पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून करोडो शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

भारतातील लोकांचे दरडोई उत्पन्न डब्बल

मागच्या काही वर्षांत भारतातील लोकांचे दरडोई उत्पन्न डब्बल झाल्याचे अर्थमंत्र्यांनी सुरुवातीला जाहीर केले. त्याचबरोबर दरडोई उत्पन्न 1.97 लाख रुपये वार्षिक झाले आहे. भारतीय अर्थव्यवस्था अधिक मजबूत झाली आहे, त्याचा परिणाम लोकांच्या राहणीमानावर दिसत आहे.

चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.