Union Budget 2023 : बजेटपूर्वी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी वाटला हलवा, दोन वर्षानंतर प्रथेला पुन्हा सुरुवात

Union Budget 2023 : बजेट तयार करण्याच्या प्रक्रियेतील अनोखी प्रथा दोन वर्षानंतर पुन्हा एकदा सुरु झाली आहे.

Union Budget 2023 : बजेटपूर्वी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी वाटला हलवा, दोन वर्षानंतर प्रथेला पुन्हा सुरुवात
प्रथेला पुन्हा सुरुवात
Follow us
| Updated on: Jan 26, 2023 | 7:12 PM

नवी दिल्ली : बजेट (Union Budget 2023) सादर होण्यास आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत.  1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे पूर्ण बजेट आहे. त्यामुळे या बजेटकडून सर्वसामान्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. यावर्षीचे बजेट कोरोना मुक्त आहे. बजेट 2023-24 हे डिजिटल असेलच. पण महामारीमुळे दोन वर्षांत ज्या प्रथा, परंपरा थांबल्या, त्यांना पुन्हा सुरुवात झाली आहे. हलवा सोहळा (Halwa Ceremony) हा त्यातीलच एक खास प्रथा आहे.

आज 26 जानेवारी 2023 रोजी, प्रजासत्ताक दिनी (Republic Day) निर्मला सीतारमण यांनी हलव्याचे वाटप केले. दोन वर्षानंतर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बजेटसंबंधीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हलव्याचे वाटप केले. बजेटला अंतिम रुप मिळाल्याचा हा संकेत असतो.

हे सुद्धा वाचा

हलवा सोहळ्यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, राज्यअर्थमंत्री डॉ. भागवत कराड, अर्थमंत्रालयातील ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. या प्रथेनंतर बजेट सादर होण्यापर्यंत लॉक-इन कालावधी असतो. या कालावधीत अधिकाऱ्यांना अर्थ मंत्रालय सोडून बाहेर जाता येत नाही.

बजेटची तयारी पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी हलवा सोहळा करण्यात येतो. बजेट तयार झाल्याचा हा एकप्रकारे संकेत असतो. या सोहळ्यात अर्थ मंत्रालयातील मोठे अधिकारी, मंत्री सहभागी होतात. हा एकप्रकारे गेट टू गेदरचा कार्यक्रम असतो.

बजेटसंबंधीची कोणतीही माहिती बाहेर पडू नये, यासाठी मोठ्या अधिकाऱ्यांसमेत, सचिव आणि इतर कर्मचारी अर्थ मंत्रालयाच्या परिसरात ठाण मांडून राहतात. जवळपास 100 कर्मचारी या परिसरात राहतात. ते बाहेर पडत नाहीत. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बजेट सादर केल्यानंतर त्यांची सूटका होते.

भारतीय संस्कृती कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गोड खाऊन करतात. बजेटचे अवघड कार्य कर्मचाऱ्यांच्या मेहनतीने लिलया पूर्ण होते. त्यामुळे तोंड गोड करुन हा सोहळा साजरा करण्यात येतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला रंग चढतो.

केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या 10 नार्थ ब्लॉक परिसरात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. जोपर्यंत बजेट सादर होत नाही. तोपर्यंत कर्मचारी याच परिसरात राहतात. या ठिकाणी त्यांच्या निवासाची, जेवणाची सर्व व्यवस्था करण्यात येते.

Non Stop LIVE Update
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.