
Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रावर मोठी तरतूद करण्यात आली आहे. भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी 6.81 लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली गेली आहे. मागील वर्षी ही तरतूद 6.21 लाख कोटी रुपये होती. भारताच्या संरक्षण क्षेत्रावरील तरतुदीमुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. पाकिस्तानी तज्ज्ञांनी भारत संरक्षण क्षेत्रात अधिक मजबूत होत असून पाकिस्तानसाठी हे धोकादायक असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानचे माजी लष्करी अधिकारी गुलाम मुस्तफा यांनी भारताने संरक्षण क्षेत्रावर केलेल्या तरतुदीमुळे भीती व्यक्त केली आहे. नवी दिल्लीतील भाजप सरकार अखंड भारत करण्याकडे आपली वाटचाल बनवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारताच्या या अखंड भारताच्या स्वप्नात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा भाग असणार आहे, असे मुस्तफा यांनी म्हटले आहे.
मुस्तफा यांनी सांगितले की, भारत फक्त पाकिस्तान अन् अफगाणिस्तानपर्यंत थांबणार नाही तर समुद्र क्षेत्रात इंडोनेशिया आणि मेलेशियापर्यंत जाणार आहे. भारतीय नैदलाचा क्षमता मोठी आहे, त्या तुलनेत पाकिस्तानी शक्ती खूप कमी आहे. नैदल क्षेत्रात भारताची शक्ती चीनप्रमाणे झाली आहे. तसेच सातत्याने भारताच्या शक्तीत वाढ होत आहे.
भारताला दुसऱ्या खंडावर हल्ला करायचा नसेल तर एवढ्या मोठ्या नौदलाची गरज का आहे, असा सवाल गुलाम मुस्तफा केला. यानंतर आणखी एका माजी लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, भारताचे उद्दिष्ट हिंद महासागरावर नियंत्रण प्रस्थापित करणे आणि त्यानंतर आपल्या सैन्य आणि हवाई दलाची ताकद वाढवणे आहे. भारत आपल्या पायदळ आणि हवाईदलाची ताकद वाढवत आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संरक्षण क्षेत्र अधिक मजबूत करताना देशातील मध्यमवर्गीयांना चांगली भेट दिली आहे. अर्थमंत्र्यांनी आयकर मर्यादा वाढवून १२ लाख केली आहे. त्याचा फायदा देशातील कोट्यवधी लोकांना होणार आहे.