EP 08 : Bus, Evadach Swapna Aahe | गुंतवणूकदारांच्या बजेटकडून अपेक्षा काय?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: अक्षय चोरगे

Updated on: Jan 31, 2022 | 12:45 PM

एवढंच नव्हे तर म्युच्युअल फंडाच्या (Mutual Funds) इक्विटी योजनांमध्येही 50 ते 60 टक्के वाढ झालीय. मात्र, आता गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारातील चढ-उतारामुळे राधेश्याम यांची चिंता वाढलीय. वाढलेलं मूल्यांकन, गुंतवणुकीवर अंकुश तसेच व्याजाच्या दरात वाढ होत असल्यानं बाजारात मोठी घसरण होऊ शकते.

EP 08 : Bus, Evadach Swapna Aahe | गुंतवणूकदारांच्या बजेटकडून अपेक्षा काय?
What Investors expecting from Budget

कोरोनाकाळात (Corona Update) सगळे बाजार ठप्प असताना शेअर बाजारात (Share Market) मात्र तेजी होती. नाशिकच्या इंदिरा नगरमध्ये राहणारे राधेश्याम चव्हाण यांनी गेल्या दीड ते दोन वर्षात बक्कळ कमाई केली आहे. गेल्या दोन वर्षात त्यांच्या अनेक शेअर्सनी 50 ते 70 टक्के रिटर्न दिलं. एवढंच नव्हे तर म्युच्युअल फंडाच्या (Mutual Funds) इक्विटी योजनांमध्येही 50 ते 60 टक्के वाढ झालीय. मात्र, आता गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारातील चढ-उतारामुळे राधेश्याम यांची चिंता वाढलीय. वाढलेलं मूल्यांकन, गुंतवणुकीवर अंकुश तसेच व्याजाच्या दरात वाढ होत असल्यानं बाजारात मोठी घसरण होऊ शकते.

कोरोनाकाळात शेअर बाजारानं गुंतवणूकदारांना तारलं

राधेश्याम यांची नजर आता येणाऱ्या बजेटवर आहे. बजेट बाजाराची दिशा ठरवत असते. शेअर बाजारातील तेजी कायम राहावी असं बजेट सरकारनं आणावं असं राधेश्याम यांच्याप्रमाणे सगळ्याच गुंतवणूकदारांची अपेक्षा आहे. तसेच सरकारकडून होत असलेली टॅक्स वसुलीत सूट मिळावी अशी गुंतवणूकदारांची अपेक्षा आहे. कोरोनाकाळात जेंव्हा सगळे उद्योग ठप्प होते, त्यावेळी शेअर बाजार उसळला होता. बीएसई सेन्सेक्समधून 2020 मध्ये 16 टक्के आणि 2021 मध्ये 22 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळाला.

तर कोरोनाच्या अगोदर 2019 मध्ये 14.37 टक्के रिटर्न मिळाला होता. कोरोनाकाळात देशात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्याही सतत वाढत आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी लागणाऱ्या डीमॅट खात्यांची संख्याही वाढलीय. मार्च 2019 मध्ये 3.6 कोटी डीमॅट खाती होती. नोव्हेंबर 2021 मध्ये 7.7 कोटी डीमॅट खाती आहेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI