जगातील या दहा देशांमध्ये जनतेकडून घेतला नाही जातो टॅक्स, मग अर्थव्यवस्था चालते कशी?
Budget 2024: जगातील दहा देश आहेत की ज्या ठिकाणी एक रुपयासुद्धा आयकर घेतला जात नाही. त्यानंतर त्या देशांची अर्थव्यवस्था सुदृढ आहे. त्या देशांची अर्थव्यवस्था चालते तरी कशी? ही देश आहेत तरी कोणती? जाणून घेऊ या...

पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात कोणाला काय मिळणार? आयकरदात्यांना दिलासा मिळणार का? कोणत्या कर वाढणार अन् कोणते कमी होणार? याकडे सर्व देशवासियांचे लक्ष लागले आहे. परंतु जगातील दहा देश आहेत की ज्या ठिकाणी एक रुपयासुद्धा आयकर घेतला जात नाही. त्यानंतर त्या देशांची अर्थव्यवस्था सुदृढ आहे. त्या देशांची अर्थव्यवस्था चालते तरी कशी?
संयुक्त अरब अमिरात
संयुक्त अरब अमिरातमध्ये (UAE) जनतेकडून कोणत्याही प्रकारचा वैयक्तिक कर घेतला जात नाही. त्याऐवजी, सरकार अप्रत्यक्ष करांवर अवलंबून असते. जसे आपल्याकडे व्हॅट (मूल्यवर्धित कर) आणि इतर शुल्क घेतले जातात. तेल आणि पर्यटनामुळे युएईची अर्थव्यवस्था खूप मजबूत आहे. यामुळे या देशात आयकरातून सवलत देण्यात आली आहे.
बहरीन
करमुक्त देशांच्या यादीत बहरीनचे नाव आहे. या देशातही जनतेकडून कोणताच कर घेतला जात नाही. या ठिकाणीसुद्धा प्रत्यक्ष कर घेण्याऐवजी अप्रत्यक्ष करच घेतले जातात. ही पद्धत देशातील लहान व्यवसायायिक आणि स्टार्टअपसाठी चांगली असल्याचे म्हटले जाते. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते.




कुवेत
संपूर्णपणे तेलाच्या उत्पन्नावर कुवेतची अर्थव्यवस्था आहे. यामुळे करमुक्त देशांत कुवेतचाही समावेश आहे. या देशात जनतेकडून एक रुपयाही कर घेतला जात नाही. कारण कुवेतमध्ये सरकारला सर्वात जास्त पैसा तेल निर्यातीतून मिळतो.
सौदी अरब
सौदी अरेबियानेही आपल्या देशातील जनतेला करांच्या जाळ्यातून पूर्णपणे मुक्त ठेवले आहे. या देशात प्रत्यक्ष कर नाही. या देशातील अप्रत्यक्ष करप्रणालीही मजबूत आहे. त्यातून मिळणाऱ्या पैशातून अर्थव्यवस्थेला चालना मिळते.
बहामा
बहामास या देशला पर्यटकांसाठी स्वर्ग म्हटले जाते. पश्चिम गोलार्धात असलेल्या या देशात सरकार जनतेकडून आयकर घेत नाही. आयकर मुक्त असलेला हा आणखी एक देश आहे.
ब्रुनेई
दक्षिण पूर्व आशियामध्ये असलेल्या ब्रुनेई हा देश आयकर मुक्त आहे. तेलामुळे समृद्ध असलेला हा इस्लामिक देश आहे.
केमन बेटे
उत्तर अमेरिका खंडातील कॅरिबियन प्रदेशात केमन बेटांचा देश येतो. हे देखील पर्यटकांसाठी एक आकर्षक ठिकाण आहे. या देशात कोणालाही आयकर भरावा लागत नाही.
ओमान
बहारीन आणि कुवेतबरोबर आखाती देश ओमानचाही आयकर मुक्त देशाच्या यादीत समावेश आहे. जे ओमानचे नागरिक आहेत त्यांना आयकर भरावा लागत नाही. याचे कारण ओमानचे मजबूत तेल आणि वायू क्षेत्र असल्याचे मानले जाते.
कतार
ओमान, बहारीन आणि कुवेतप्रमाणेच कतारमध्ये आयकर नाही. कतार तेल क्षेत्रातही खूप मजबूत आहे. हा देश छोटा असला तरी इथे राहणारे लोक खूप श्रीमंत आहेत.
मोनॅको
युरोपमधील एक अतिशय छोटा देश मोनॅको. या देशातही नागरिकांकडून कधीच आयकर वसूल केला जात नाही.