AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जीएसटी परिषदेच्या 46 व्या बैठकीला सुरुवात, अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची उपस्थिती; महत्त्वपूर्ण विषयांवर निर्णयाची शक्यता

अर्थमंत्री निर्मला सितारमण (Finance Minister of India) यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेच्या (GST Council 46th Meeting) 46 व्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.

जीएसटी परिषदेच्या 46 व्या बैठकीला सुरुवात, अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची उपस्थिती; महत्त्वपूर्ण विषयांवर निर्णयाची शक्यता
निर्मला सितारमन
| Edited By: | Updated on: Dec 31, 2021 | 12:09 PM
Share

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सितारमण (Finance Minister of India) यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेच्या (GST Council 46th Meeting) 46 व्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. टेक्सटाईल सेक्टरवर जीएसटी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कापड उद्योगावरील जीएसटी पाच टक्क्यांवरून 12 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज हा निर्णय पुन्हा एकदा वापस घेतला जाऊ शकतो. हा निर्णय मागे घेतल्यास सर्व सामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. जीएसटी संदर्भातील सर्व निर्णय हे जीएसटी परिषदेकडून घेण्यात येतात.

‘या’ विषयांवर चर्चा होण्याची शक्यता

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाऊ शकतात. कपडे आणि चपलांवर जीएसटी वाढवण्याचे संकेत यापूर्वीच केंद्राकडून देण्यात आले होते. कापड उद्योगावरील जीएसटी 5 टक्क्यांवरून वाढून 12 टक्के करण्याचा विचार सुरू होता. मात्र हा निर्णय तुर्तास लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. तसेच जीएसटीच्या स्लॅब घटवण्यावर देखील चर्चा होऊ शकते.

जीएसटीमधून  सरकारची किती कमाई ?

वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान संसदेमध्ये बोलताना माहिती दिली की, एप्रिल 2021 ते डिसेंबर 2021 पर्यंत जीएसटीच्या माध्यमातून केंद्र सरकारला एकूण 7.39 लाख कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. ज्यामध्ये 3 लाख  63 हजार कोटी रुपयांचा व्यवसायिक कर तर 3 लाख 61 हजार  कोटींच्या व्यक्तीगत कराचा समावेश आहे. तर उर्वरित 5 हजार 375 कोटी रुपये अन्य कराच्या माध्यमातून मिळाले.

संबंधित बातम्या

खात्यात बॅलन्स नसताना, बँक देईल मोठी रक्कम, ओव्हरड्राफ्ट सुविधेचा उठवा फायदा, तारण ठेवा आणि सुविधा मिळवा 

EPFO Update | नोकरदार वर्गासाठी ईपीएफओचा दिलासा, 31 डिसेंबरनंतरही करता येणार ई-नॉमिनेशन प्रक्रिया

‘लिबोर’ पर्वाचा अस्त: कर्ज दर निश्चितीची नवी संरचना, स्टेट बँक बदलासाठी सज्ज

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट