AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लिबोर’ पर्वाचा अस्त: कर्ज दर निश्चितीची नवी संरचना, स्टेट बँक बदलासाठी सज्ज

बँकेने जारी केलेल्या माहितीनुसार, नव्या संरचनेनुसार एसबीआय सर्व सिस्टीम आणि प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. जेणेकरुन पर्यायी संदर्भ दराला (एसआरआर) सहाय्यभूत ठरतील. स्टेट बँकेने नवीन बदलाचा संदर्भ घेऊन भारतातील आणि भारताबाहेरील बँकेच्या शाखांद्वारे एसआरआर लिंक्ड प्रॉडक्ट उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केली आहे.

'लिबोर' पर्वाचा अस्त: कर्ज दर निश्चितीची नवी संरचना, स्टेट बँक बदलासाठी सज्ज
State Bank OF India
| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 11:44 PM
Share

नवी दिल्ली : जागतिक अर्थपटलावर नव्या कर्ज दर प्रारुप निश्चितीचे वारे वाहत आहे. गेल्या चार दशकांपासून कर्ज दर निश्चितीसाठीची संदर्भ दर म्हणून अमलात असलेली ‘लिबोर’ पद्धत रद्द होणार आहे. स्टेट बँक आॕफ इंडिया (State Bank of India) पर्यायी संदर्भ दर संरचनेला (एआरआर) समर्थित ठरणारी संरचना अमलात आणण्याच्या तयारीत आहे. बँकाने दिलेली माहितीनुसार भारतातील तसेच भारताबाहेरील बँकांच्या शाखांतून एसआरआर संलग्नित प्रॉडक्ट उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे.

नव्या वर्षात ‘लिबोर’ पर्वाचा अंत!

गेल्या चार दशकांपासून ‘लिबोर’ संरचना अस्तित्वात आहे. कर्ज दर, तारण मूल्य तसेच काॕर्पोरेट कर्जाचे दर निश्चित करण्यासाठी ‘लिबोर’चा संदर्भ घेतला जातो. गेल्या काही दिवसांपासून लिबोर कार्यपद्धती व अंमलबजावणी वरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. तसेच शंकाही निर्माण झाल्या होत्या. जगभरातील शीर्ष वित्तीय संस्थांनी ‘लिबोर’चा वापर न करण्याचा निर्णय घेतला होता.

जगभरातील 18 केंद्रीय बँकांशी सल्लामसालत करुन विविध कालावाधीसाठी मापदंड निश्चित केले जातात. त्यानुसार कर्ज दर निश्चित केला जात होते. जानेवारी पासून ‘लिबोर’ ऐवजी पर्यायी कर दर (एआरआर) अंमलबजावणी केली जाणार आहे.

रिझर्व्ह बँक सहित सर्व बँकांचे व्यवहार नव्या व्यवस्थेनुसार होणार आहेत. एसबीआयने डिसेंबर-2020 मध्ये नव्या बदलाला अनुकूलता दर्शविली होती. त्याअनुसार पावले उचलण्यास सुरुवात केली. बँक एसओएफआर व्यवहार व डील्स साठी आवश्यक यंत्रणा सज्ज केली आहे.

स्टेट बँकेचे इंटरनॅशनल बँकिंगचे कार्यकारी संचालक अश्विनी कुमार यांनी ‘एसआरआर’ नुसार नवीन ट्रान्झॕक्शन साठी बँक सज्ज असल्याचे म्हटले आहे.

‘लिबोर’ म्हणजे काय रं भाऊ?

‘लिबोर’ला नाव लंडन शहराच्या नावातून मिळाले आहे. दी लंडन इंटर-बँक ऑफर रेट हा लंडनमधील आघाडीच्या बँकांनी सादर केलेल्या अंदाजानुसार मोजल्या जाणारा व्याज दराची सरासरी आहे. प्रत्येक बँका अन्य बँकांकडून कर्ज घ्यायचे असेल तर अंदाजित व्याजदराची आखणी करतात. वित्तीय बाजारपेठेत आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रांमध्ये बर्‍याच आर्थिक साधनांचा संदर्भ दर म्हणून लिबोरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. डॅनिश, स्वीडिश, कॅनेडियन, ऑस्ट्रेलियन आणि न्यूझीलंड लिबोर दर यापूर्वीच संपुष्टात आणले गेले आहेत.

दररोज सकाळी 11.30 वाजता लिबोर दर प्रकाशित केले जातात. आर्थिक संस्था,लेंडर आणि क्रेडिट कार्ड एजन्सींनी त्यांच्या स्वत: च्या दर संबंधित दर निर्धारित केले आहेत.

इतर बातम्या :

वर्ष 2022: नियोजन हेच धोरण, तुमच्या प्रभावी ‘अर्थ’संकल्पासाठी ‘6’ मंत्र!

फेअरवर्क रिपोर्ट 2021 : कामगार वेतन ते व्यवस्थापन, ‘फ्लिपकार्ट’ टॉप, ओला-उबर तळाला!

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.