सेन्सेक्समधील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचे बाजारमूल्य 1.29 लाख कोटींनी वाढले, TCS ला सर्वाधिक नफा

टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी, बजाज फायनान्स आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे बाजारमूल्य सप्ताहात वाढले. या कालावधीत रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि भारती एअरटेलचे बाजारमूल्य घटले.

सेन्सेक्समधील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचे बाजारमूल्य 1.29 लाख कोटींनी वाढले, TCS ला सर्वाधिक नफा
टीसीएस

नवी दिल्लीः सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांचे बाजारमूल्य (Market Cap) गेल्या आठवड्यात 1,29,047.61 कोटी रुपयांनी वाढले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (TCS) याच काळात सर्वात जास्त फायदा झाला. गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 समभागांचा सेन्सेक्स 589.31 अंकांनी किंवा 1.03 टक्क्यांनी वाढला होता.

आयसीआयसीआय बँक आणि भारती एअरटेलचे बाजारमूल्य घटले

टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी, बजाज फायनान्स आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे बाजारमूल्य सप्ताहात वाढले. या कालावधीत रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि भारती एअरटेलचे बाजारमूल्य घटले.

TCS चे बाजार भांडवल 71,761.59 कोटी रुपयांनी वाढले

अहवालाच्या आठवड्यात TCS चे बाजारमूल्य 71,761.59 कोटी रुपयांनी वाढून 13,46,325.23 कोटी रुपये झाले. दुसरीकडे इन्फोसिसचे बाजारमूल्यही 18,693.62 कोटी रुपयांनी वाढून 7,29,618.96 कोटी रुपयांवर पोहोचले. त्याचप्रमाणे बजाज फायनान्सचे बाजार भांडवल 16,082.77 कोटी रुपयांनी वाढून 4,26,753.27 कोटी रुपये आणि HDFC बँकेचे बाजार भांडवल 12,744.21 कोटी रुपयांनी वाढून 8,38,402.80 कोटी रुपये झाले.

एचडीएफसीच्या बाजार मूल्यांकनातही 5,393.86 कोटींची वाढ

आठवडाभरात एचडीएफसीचे बाजारमूल्य 5,393.86 कोटी रुपयांनी वाढून 5,01,562.84 कोटी रुपयांवर पोहोचले. स्टेट बँक ऑफ इंडियाचे मूल्यांकन 2,409.65 कोटी रुपयांनी वाढून 4,22,312.62 कोटी रुपयांवर पोहोचले. हिंदुस्तान युनिलिव्हरने अहवालाच्या आठवड्यात 1,961.91 कोटी रुपये नफा कमावला आणि तिचे बाजार भांडवल आता 5,50,532.73 कोटी रुपयांवर पोहोचले.

या कंपन्यांचे बाजारमूल्य घटले

या ट्रेंडच्या विरोधात भारती एअरटेलचे बाजारमूल्य 10,489.77 कोटी रुपयांनी घसरून 3,94,519.78 कोटी रुपये झाले. ICICI बँकेचे बाजारमूल्य 3,686.55 कोटी रुपयांनी घसरून 4,97,353.36 कोटी रुपये झाले आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य 2,537.34 कोटी रुपयांनी घसरून 15,27,572.17 कोटी रुपये झाले. टॉप 10 कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजने पहिले स्थान कायम राखले. त्यानंतर अनुक्रमे टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, एसबीआय आणि भारती एअरटेल यांचा क्रमांक लागतो.

संबंधित बातम्या

पर्यटनाचा प्लॅन बनवत आहात? तर ‘या’ क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळू शकतात चांगल्या ऑफर

Investment Tips: करोडपती होण्यासाठी 4 निश्चित मंत्र, त्यांना स्वीकारल्यास व्हाल श्रीमंत

Published On - 12:27 pm, Sun, 5 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI