AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पर्यटनाचा प्लॅन बनवत आहात? तर ‘या’ क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळू शकतात चांगल्या ऑफर

जर तुम्हाला तुमचे पर्यटन प्लॅन बजेटमध्ये बसवायचे असतील तर क्रेडिट कार्डची मदत होऊ शकते. सध्या विविध बँका आपल्या ग्रहकांना क्रेडिट कार्डच्या माध्यमातून चांगल्या ऑफर देत आहेत.

पर्यटनाचा प्लॅन बनवत आहात? तर 'या' क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळू शकतात चांगल्या ऑफर
| Edited By: | Updated on: Dec 05, 2021 | 12:19 PM
Share

नवी दिल्ली : Best Travel Credit Cards आता लवकरच सुट्यांचा हंगाम सुरू होणार आहे. अनेक जण सुट्यांमध्ये पर्यटनाचा बेत आखत असतात. गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे इच्छा असूनही अनेकांना बाहेर पडता आले नाही. मात्र आता कोरोनाचे सावट कमी झाल्याने अनेकजण बाहेरगावी फिरायला जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. जर तुम्हाला तुमचे पर्यटन प्लॅन बजेटमध्ये बसवायचे असतील तर क्रेडिट कार्डची मदत होऊ शकते. सध्या विविध बँका आपल्या ग्रहकांना क्रेडिट कार्डच्या माध्यमातून चांगल्या ऑफर देत आहेत. कुठली बँक कोणती ऑफर देत आहे? त्याबद्दल जाणून घेऊयात.

HDFC Regalia क्रेडिट कार्ड

HDFC Regalia या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आपल्याला एक कोटी रुपयांचा अपघाती विम्याचा लाभ दिला जातो. हा विमा परदेशामध्येही लागू होतो. समजा तुम्ही परदेशात पर्यटनासाठी गेला आहात आणि तिथे तुमचा अपघात झाला, तर तुम्हाला या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून विम्याची रक्कम मिळते. अपघात झाल्यानंतर तातडीने दवाखान्यातील खर्चासाठी 15 लाख रुपयांची रक्कम तुम्हाला या क्रेडिट कार्डतंर्गत मिळू शकते. या क्रेडिट कार्डसाठी वर्षाला 2500 रुपये इतकी वार्षिक फी आकारली जाते.

Axis विस्तारा सिग्नेचर क्रेडिट कार्ड

हे एक आणखी महत्त्वपूर्ण आणि ग्राहकांच्या फायद्याचे क्रेडिट कार्ड आहे. हे कार्ड असल्यास ग्राहकाला विस्ताराच्या सर्व सेवामध्ये चांगला डिस्काऊंट मिळतो. सोबतच या कार्डसोबत ग्राहकांना 2.5 कोटी रुपयांचा अपघाती विमा देखील देण्यात येतो. परदेशात देखील या विम्याचे फायदे मिळतात. तसेच इतर विविध प्रकारच्या खरेदीत देखील भरघोस डिस्काऊंट मिळू शकतो. या कार्डसाठी कार्डधारकाकडून वर्षाला तीन हजार रुपये इतकी फी आकारली जाते.

एयर इंडिया SBI सिग्नेचर क्रेडिट कार्ड

या कार्डधारकाला एयर इंडियाच्या प्रत्येक तिकीट खरेदीवर 30 रिवॉर्ड पॉईंट्स भेटतात. ज्या पॉईंटसची संख्या ही 100 झाल्यानंतर ग्राहकाला एखादी चांगली ऑफर देण्यात येते. ज्यामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होऊ शकतो. तसेच ज्याच्याकडे एयर इंडिया SBI सिग्नेचर क्रेडिट कार्ड असेल त्याला एयर इंडियाच्या इतर सेवांमध्ये देखील डिस्काऊंट मिळू  शकते. यासोबतच बँकेच्या वतीने क्रेडिट कार्डवर वर्षभर विविध ऑफर जाहीर करण्यात येतात त्याचा फायदा हा ग्राहकांना होत असतो.

संबंधित बातम्या

आपल्या कुटुंबातील वडिलधाऱ्यांच्या नावाने हे खाते उघडा, कर सवलतीचा लाभ; पैसाही सुरक्षित

5000 कोटींच्या AK-203 कराराला मोदी सरकारची मान्यता, अमेठीत बनणार 5 लाखांहून अधिक रायफल्स

MF Scheme: कमी कालावधीत मोठी रक्कम जमा करायचीय? अशी करा गुंतवणूक, 10 वर्षात मिळतील 5 कोटी रुपये

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.