5000 कोटींच्या AK-203 कराराला मोदी सरकारची मान्यता, अमेठीत बनणार 5 लाखांहून अधिक रायफल्स

गेल्या वर्षी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या मॉस्को दौऱ्यात रशिया आणि भारत या दोन्ही देशांनी या कराराला तत्त्वतः मान्यता दिली होती. उत्तर प्रदेश भारताचे संरक्षण उत्पादन केंद्र बनण्याच्या मार्गावर आहे. “हे संरक्षण अधिग्रहणातील खरेदी (जागतिक) ते मेक इन इंडियापर्यंतच्या प्रवासातील सतत बदल दर्शवते.

5000 कोटींच्या AK-203 कराराला मोदी सरकारची मान्यता, अमेठीत बनणार 5 लाखांहून अधिक रायफल्स

नवी दिल्लीः केंद्रातील मोदी सरकारने उत्तर प्रदेशातील अमेठीतल्या कोरवा येथे 5,000 कोटींच्या पाच लाख AK-203 असॉल्ट रायफल्सच्या निर्मिती कराराला अंतिम मंजुरी दिलीय. अधिकृत सूत्रांनी शनिवारी ही माहिती दिलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात सोमवारी दिल्लीत होणाऱ्या शिखर परिषदेत या मोठ्या कराराची औपचारिक घोषणा करण्यात ेयणार असल्याचंही सांगण्यात येतंय.

डिफेन्स अॅक्विझिशन कौन्सिल (DAC) चा याला हिरवा झेंडा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ने बुधवारी हा करार मंजूर केला, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालीय. काही दिवसांपूर्वी डिफेन्स अॅक्विझिशन कौन्सिल (DAC) ने याला हिरवा झेंडा दाखवला होता. “भारतातील संरक्षण उत्पादनात स्वावलंबनाला चालना देण्याच्या प्रयत्नात सरकारने अमेठीतील कोरवा येथे पाच लाखांहून अधिक एके-203 असॉल्ट रायफल तयार करण्याच्या योजनेला मंजुरी दिली,” अशी माहिती सूत्रांकडून मिळालीय.

संरक्षणमंत्र्यांची या कराराला तत्त्वतः मान्यता

गेल्या वर्षी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या मॉस्को दौऱ्यात रशिया आणि भारत या दोन्ही देशांनी या कराराला तत्त्वतः मान्यता दिली होती. उत्तर प्रदेश भारताचे संरक्षण उत्पादन केंद्र बनण्याच्या मार्गावर आहे. “हे संरक्षण अधिग्रहणातील खरेदी (जागतिक) ते मेक इन इंडियापर्यंतच्या प्रवासातील सतत बदल दर्शवते. हा प्रयत्न रशियाच्या भागीदारीत केला जाणार असून, यातून दोन्ही देशांमधील संरक्षण क्षेत्रातील भागीदारी अधिक दृढ होत असल्याचे दिसून येत असल्याचं सांगितलं जातंय.

कच्चा माल आणि घटकांच्या पुरवठ्यासाठी व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार

या प्रकल्पामुळे विविध सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (MSME) आणि इतर संरक्षण उद्योगांना कच्चा माल आणि घटकांच्या पुरवठ्यासाठी व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. या 7.62 X 39 मिमी कॅलिबर AK-203 (असॉल्ट कलाश्निकोव्ह-203) रायफल्स तीन दशकांपूर्वी सेवेत असलेल्या INSAS रायफल्सची जागा घेतील.

दहशतवाद आणि अतिरेक्यांच्या विरोधात ताकद वाढेल

AK-203 असॉल्ट रायफल 300 मीटरच्या प्रभावी रेंजसह हलकी, मजबूत आणि सिद्ध तंत्रज्ञानासह वापरण्यास सोपी आधुनिक असॉल्ट रायफल आहे, असंसुद्धा सूत्रांनी सांगितले. सध्याच्या आणि परिकल्पित ऑपरेशनल आव्हानांचा पुरेसा सामना करण्यासाठी हे सैन्यांची लढाऊ क्षमता वाढवतील. यामुळे दहशतवादविरोधी आणि बंडखोरीविरोधी कारवायांमध्ये भारतीय लष्कराची कार्यक्षमता वाढेल. इंडो-रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड (IRRPL) या विशेष उद्देशाच्या संयुक्त उपक्रमाद्वारे हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. हे भारताच्या पूर्वीच्या OFB-ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड (आता Advanced Weapons and Equipment India Limited (AWEIL) आणि Munitions India Limited (MIL) आणि रशियाचे Rosoboronexport (ROE) आणि कलाश्निकोव्ह) यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेय.

संबंधित बातम्या

MF Scheme: कमी कालावधीत मोठी रक्कम जमा करायचीय? अशी करा गुंतवणूक, 10 वर्षात मिळतील 5 कोटी रुपये

एसबीआय नेट बँकिंगद्वारेही व्हेरिफाय करु शकता आयटीआर, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती

Published On - 10:02 am, Sun, 5 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI