AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MF Scheme: कमी कालावधीत मोठी रक्कम जमा करायचीय? अशी करा गुंतवणूक, 10 वर्षात मिळतील 5 कोटी रुपये

इक्विटी म्युच्युअल फंडाचा वार्षिक परतावा 10 टक्के आहे असे गृहीत धरल्यास, दरमहा 2.42 लाख रुपये जमा करावे लागतील. या रकमेच्या मदतीने 10 वर्षांत 5 कोटी रुपये आरामात मिळू शकतात. त्याचप्रमाणे, वार्षिक परतावा 12 टक्के गृहीत धरला आणि 10 वर्षांत 5 कोटी रुपये आवश्यक असतील, तर दरमहा 2.16 लाख रुपये जमा करावे लागतील.

MF Scheme: कमी कालावधीत मोठी रक्कम जमा करायचीय? अशी करा गुंतवणूक, 10 वर्षात मिळतील 5 कोटी रुपये
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Dec 05, 2021 | 7:30 AM
Share

नवी दिल्ली : कमीत कमी कालावधीमध्ये अधिक पैसे मिळवण्याची प्रत्येकाला इच्छा असते. यासाठी गुंतवणुकीसाठी विविध पर्याय आपण तपासत असतो. जर तुम्ही बराच काळ पैसा जमा करत राहिलात तर बंपर रिटर्न मिळण्याची शक्यता पूर्ण होते. पण जर तुम्हाला 10 वर्षांच्या कमी कालावधीत करोडपती व्हायचे असेल तर इक्विटी म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की केवळ दरमहा पैसे जमा करून चालणार नाही तर तुम्हाला शिस्तबद्ध गुंतवणूकदार व्हावे लागेल. शिस्तबद्ध गुंतवणूकदाराचा अर्थ असा आहे की परताव्याचे प्रमाण वाढवताना, इतर खर्चात कपात करावी लागली तरी, ठेव रकमेत कोणतीही कपात केली जाऊ नये. म्युच्युअल फंडाच्या प्रमुख नियमांपैकी एक म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा एसआयपी. जर तुम्ही ठेव रक्कम आणि मॅच्युरिटी रक्कम न काढता दरवर्षी वाढवत राहिल्यास, तुम्ही जमा केलेली रक्कम देखील वाढवू शकता, तर तुम्हाला 15 टक्क्यांपर्यंत परतावा सहज मिळू शकेल.

SIP ची आवश्यकता

इथे आणखी एक गोष्ट गृहीत धरूया की फक्त एक SIP चालणार नाही, तर अनेक SIP घ्याव्या लागतील. एसआयपीमध्ये तुम्हाला दर महिन्याला किती रक्कम जमा करायची आहे ते तुमच्या ठेवीवर मिळणाऱ्या परताव्यावर अवलंबून असेल. जर तुम्हाला कमी दिवसात जास्त परतावा हवा असेल तर तुम्हाला SIP ची रक्कम वाढवावी लागेल. तीन श्रेणींमध्ये एसआयपी रिटर्न्स विचारात घेतल्यास आणि त्यानुसार रिटर्न्स पाहिल्यास, 10 वर्षांत 5 कोटी रुपये मिळविण्यासाठी आम्हाला किती जमा करावे लागेल हे स्पष्ट होईल.

किती पैसे जमा करावे लागतील

इक्विटी म्युच्युअल फंडाचा वार्षिक परतावा 10 टक्के आहे असे गृहीत धरल्यास, दरमहा 2.42 लाख रुपये जमा करावे लागतील. या रकमेच्या मदतीने 10 वर्षांत 5 कोटी रुपये आरामात मिळू शकतात. त्याचप्रमाणे, वार्षिक परतावा 12 टक्के गृहीत धरला आणि 10 वर्षांत 5 कोटी रुपये आवश्यक असतील, तर दरमहा 2.16 लाख रुपये जमा करावे लागतील. सरतेशेवटी, 14 टक्के परतावा गृहीत धरल्यास, दरमहा 1.91 लाख रुपये जमा करावे लागतील. एवढी रक्कम जमा केल्यास 10 वर्षांत 5 कोटींचे उद्दिष्ट गाठता येईल. इक्विटी म्युच्युअल फंडाच्या एसआयपीमध्ये पैसे जमा करण्याची चर्चा आहे. जरी म्युच्युअल फंड आणि एसआयपी भिन्न आहेत.

MF आणि SIP मधील फरक

म्युच्युअल फंड योजना मालमत्ता व्यवस्थापन कंपनी किंवा AMC द्वारे चालवल्या जातात ज्यामध्ये अनेक वेगवेगळ्या कंपन्यांकडून पैसे गुंतवले जातात. जसे स्टॉक, बाँड, सोने किंवा इतर सिक्युरिटीजमध्ये पैसे गुंतवले जातात तसेच म्युच्युअल फंडात पैसे जमा केले जातात. म्हणूनच, म्युच्युअल फंड हे तुमच्या पैशाला वाढ देण्यासाठी एक आर्थिक उत्पादन आहे. दुसरीकडे SIP हे गुंतवणुकीचे तंत्र आहे. तुम्ही SIP द्वारे निश्चित रक्कम जमा करू शकता. तुम्ही म्युच्युअल फंड, पीपीएफ, मुदत ठेवी किंवा 2 ग्रॅम सोने दरमहा खरेदी करण्यासाठी एसआयपीचे तंत्र देखील अवलंबू शकता. यासाठी ठराविक ठेवी ठराविक अंतराने कराव्या लागतात. SIP चे पैसे चक्रवाढ परतावा देतात आणि अनेक पटीने गुणाकार करतात. (Do this investment, you will get Rs 5 crore in 10 years)

इतर बातम्या

PPF: गुंतवणूक करायचीय? मग पीपीएफ ठरेल उत्तम पर्याय, मिळतील ‘हे’ 5 मोठे फायदे

EPFO : आता एका तासात तुमच्या बँक खात्यात पीएफचे पैसे येणार, असा करा ऑनलाइन अर्ज

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...