8th Pay Commission: कुणाचा सर्वाधिक वाढणार पगार? नवीन वर्षात उत्सुकता ताणली, अपडेट जाणून थक्क व्हाल
8th Pay Commission update: 8 व्या वेतन आयोग आजपासून 1 जानेवारी 2026 पासून लागू झाला आहे. कारण आजच 7 वा वेतन आयोग संपुष्टात आला आहे. केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगातंर्गत वेतन वाढ करणार आहे. अर्थात त्यासाठी कर्मचाऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे.

8th Pay Commission salary hike: केंद्र सरकारने लाखो कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाचं गिफ्ट दिलं आहे. आजपासून 1 जानेवारी 2026 पासून 8 वा वेतन आयोग लागू झाला आहे. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात नरेंद्र मोदी यांनी या नवीन वेतन आयोगाची घोषणा केली होती. पगारातील वाढ ही फिटमेंट फॅक्टरशी संबंधित आहे. त्याच्या आधारावर केंद्र सरकार कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी वेतन निश्चिती करेल. सध्याच्या 7व्या वेतन आयोगाची वैधता 31 डिसेंबर रोजीच संपली आहे. तर आजपासून नवीन वेतन आयोगाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे या वेतन आयोगामुळे कुणाच्या पगारात वाढ होईल हे आता समोर येणार आहे.
कुणाच्या पगारात सर्वाधिक वाढ?
नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर सर्वच कर्मचारी आणि वेतनधारकांच्या मुळ वेतनात वाढ होणार आहे. 8 व्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या श्रेणी आणि पदानुसार वेतन वाढ होईल. सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकूण 18 श्रेणी आहेत. त्यानुसार पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. पण कुणाचा पगार किती वाढेल याची कोणतीची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
लेव्हल 1: एंट्री-लेवल / ग्रुप D कर्मचारी
लेव्हल 2–9: ग्रुप C कर्मचारी
लेव्हल 10–12: ग्रुप B कर्मचारी
लेव्हल 13–18: ग्रुप A कर्मचारी
जर फिटमेंट फॅक्टर 2.15 ठेवण्यात आले तर त्यानुसार मुळ पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
लेव्हल 1 – सध्याचा पगार: ₹18,000; वाढलेले वेतन: ₹38,700 (फरक: ₹20,700)
लेव्हल 5 – सध्याचे वेतन : ₹29,200; वाढलेला पगार: ₹62,780 (फरक: ₹33,580)
लेव्हल 10 – सध्याचा पगार : ₹56,100; वाढलेले वेतन: ₹1,20,615 (फरक: ₹64,515)
लेव्हल 15 – सध्याचे वेतन : ₹1,82,200; वाढलेला पगार: ₹3,91,730 (फरक: ₹2,09,530)
लेव्हल 18 – सध्याचा पगार: ₹2,50,000; वाढलेले वेतन: ₹5,37,500 (फरक: ₹2,09,530)
कुणाचा वाढला पगार?
तर जर फिटमेंट फॅक्टर लक्षात घेतला तर लेव्हल 18 मधील सरकारी कर्मचारी, यामध्ये कॅबिनेट सचिव आणि इतर बडे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा पागर वाढणार आहे. त्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. इतरही कर्मचाऱ्यांचे वेतन वाढेल. पण ते त्यांच्या श्रेणीनुसार वाढेल. पण बड्या अधिकाऱ्यांना नवीन वेतन वाढीचा चांगला फायदा होत असल्याचे दिसते. याकर्मचाऱ्यांना लॉटरी लागणार असल्याचे चित्र आहे.
