Union Budget 2023 :  रेल्वेचा मुखडा बदलणार, हायड्रोजनवर धावणार ट्रेन, विमानतळासारख्या सुविधा, असा होईल कायापालट

| Updated on: Jan 20, 2023 | 5:26 PM

Union Budget 2023 : रेल्वेचा कायापलट करण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात खूप मोठा बदल करण्यात येणार आहे.

Union Budget 2023 :  रेल्वेचा मुखडा बदलणार, हायड्रोजनवर धावणार ट्रेन, विमानतळासारख्या सुविधा, असा होईल कायापालट
Follow us on

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर करणार आहेत. या बजेटमध्ये त्या केंद्र सरकारचा आर्थिक लेखाजोखा मांडतील. अर्थसंकल्पात सर्वच क्षेत्रासाठी घोषणाही करण्यात येतील. तर रेल्वे खात्यासाठी (Railway Ministry) ही अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार आहे. रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प बंद झाला असला तरी रेल्वे विकासासाठी यंदा विशेष तरतूद करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री त्यासाठी मोठी घोषणा करु शकतात. टाईम्स ऑफ इंडियाने (TIO) दिलेल्या वृत्तानुसार, बजेटमध्ये वंदे भारत 2.0 आणि हायड्रोजनवर धावणाऱ्या ट्रेनसंबंधी मोठी घोषणा होऊ शकते.

रेल्वेच्या अहवालानुसार, बजेटमध्ये 400 ते 500 वंदे भारत ट्रेन आणि 4000 नवीन ऑटो मोबाईल कॅरिअर कोचची घोषणा होऊ शकते. या वर्षी मोदी सरकारने बजेटमध्ये भारतीय रेल्वेसाठी 1.9 लाख कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

काही मॉडेल रेल्वेस्टेशन करण्याची घोषणा होऊ शकते. याठिकाणी विमानतळासारख्या सोयी-सुविधा मिळतील. तुम्ही रेल्वेस्टेशनला आलात की विमानतळावर, असा प्रश्न पडेल. या अर्थसंकल्पात केंद्र सरकार ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटात सवलतीची घोषणा करु शकते.

हे सुद्धा वाचा

केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण बजेटमध्ये रेल्वेसाठी मोठ्या निधी घोषणा करु शकते. हा निधी नवीन रेल्वे ट्रॅक टाकण्यासाठी, गेज चेंज, इलेक्ट्रिफिकेशन आणि सिग्नल सिस्टम आधुनिक करण्यासाठी खर्च करण्यात येईल. त्यामुळे रेल्वेचा कायापालट होईल.

या अर्थसंकल्पात केंद्र सरकार रेल्वेच्या विकासावर आणि पायाभूत सुविधांवर भर देईल. रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर वाढीवर भर देण्यात येत आहे. अतिजलद, जलद रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे दूरची शहर लवकरच जवळ येतील.

मोदी सरकार या अर्थसंकल्पात 400 ते 500 नवीन वंदे भारत ट्रेनची घोषणा करु शकतात. त्यामुळे देशातील दळणवळणाला गती मिळेल. कोणत्याही शहरात जाण्यासाठी आता जास्त कालावधी लागणार नाही.या ट्रेनचा वेग 180 किलोमीटर प्रति तास असेल .

रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरसह ट्रेन भारतातच तयार करण्यात येत आहे. येत्या काही वर्षात भारत युरोप, दक्षिण अमेरिका, पूर्वी आशियामध्ये ट्रेन निर्यात करेल, अशी योजना केंद्र सरकार आखत आहे. या बजेटमध्ये स्लीपर कोच असलेली वंदे भारत ट्रेन सुरु करण्याची घोषणा होऊ शकते.

रेल्वेचे जाळे विस्तारण्याचा प्रयत्नही केंद्र सरकार करणार आहे. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनसाठी अर्थसंकल्पात विशेष आर्थिक तरतूद करण्यात येईल. तर नवीन रेल्वे लाईन, इलेक्ट्रिफिकेशन आणि सिग्नल व्यवस्थेत सुधारणा करण्यावर भर देण्यात येत आहे.