Railway Journey : रेल्वे सुटली, पुढच्या स्टेशनवर गाठली, पण तुमची जागा मिळाली दुसऱ्याला, आता काय करणार?

Railway Journey : तुमची ट्रेन सूटली तर काय काय होऊ शकते, मिळू शकतो का दिलासा

Railway Journey : रेल्वे सुटली, पुढच्या स्टेशनवर गाठली, पण तुमची जागा मिळाली दुसऱ्याला, आता काय करणार?
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 9:43 PM

नवी दिल्ली : भारतातील कोट्यवधी प्रवासी दररोज भारतीय रेल्वेने (Indian Railway) प्रवास करतात. कामासाठी, नातेवाईकांना भेटण्यासाठी, कार्यालयीन कामासाठी, परीक्षा वा इतर अनेक कामांसाठी रेल्वेचा प्रवास करण्यात येतो. हा प्रवास स्वस्त असतो, त्यासाठी खड्यांचा प्रवास करण्याची गरज नाही. प्रवास फार वळणाचा वा कंटाळवाणा नसतो. त्यामुळे रेल्वेचा प्रवास (Railway Journey) हा अनेकांच्या आवडीचा असतो. प्रवाशांना रेल्वेचे वेळापत्रक माहिती असते. अनेकदा प्रवाशी रेल्वे स्टेशनवर येतात. पण रेल्वे वेळेवर पोहचत नाही, असे चित्र आहे. पण एखाद्यावेळी असा विचार करत, थोडा उशीर झाला तर रेल्वे हातातून निसटते (Miss the Train) आणि इच्छितस्थळी पोहचण्याची कसरत करावी लागते. अशावेळी काय काय करता येते.

तुम्ही वेळेवर पोहचू न शकल्याने ट्रेन मिस झाल्यास, तुम्हाला पुढील स्टेशनवर ती पकडता येईल. पण तुम्ही वेळेवर निर्धारीत स्थळी हजर नसाल आणि रेल्वे सुरु झाल्यास टीटीईला (TTE) तुमची सीट दुसऱ्या प्रवाशाला देता येते. हा त्याचा अधिकार असतो.

पण तुम्ही धावत जाऊन कमी अंतरावरील स्टेशन जवळ केले तर तुम्ही तुमच्या आरक्षित जागेवर दावा करु शकता. रेल्वे आरक्षित तिकीटावर पुढील 2 रेल्वे स्टेशनपर्यंत हे आरक्षण कायम ठेवते. त्यानंतर टीटीई तुमची सीट इतर प्रवाशाला देऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

या नियमाचा एक फायदा आहे. या नियमामुळे तुमच्या स्टेशनपासून पुढील दोन स्टेशन पर्यंत आरक्षणाचा दावा कायम राहतो. त्यामुळे तुम्हाला रेल्वे गाठून सीटवर दावा करता येतो. तुम्हाला स्टेशन चुकण्याची शक्यता वाटत असेल तर अगोदरच पुढील स्टेशनचा प्रवास सुरु करा आणि लवकर ते स्टेशन गाठा. याठिकाणी ट्रेन पकडता येईल.

एवढे करुनही ट्रेन सुटलीच तर तुम्हाला तिकीटाच्या अर्ध्या रक्कमेवर दावा करता येतो. ही प्रक्रिया तुम्हाला ट्रेन सुटल्याच्या तीन तासांत पूर्ण करावी लागते. ट्रेन सुटू नये यासाठी तुम्हाला वेळेचे नियोजन करावे लागेल. नाहीतर हे नियम मदतीला धावून येतील.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.