Gautam Adani : रात्रीतूनच उभारली अदानी समूहाने नवीन कंपनी, या क्षेत्रात आजमवणार नशीब

Gautam Adani : गौतम अदानी यांनी एक महिन्यापूर्वी मार्च महिन्यात अदानी इलेक्ट्रिसिटी औरंगाबाद लिमिटेड नावाने कंपनी स्थापन केली होती. आता या समूहाने पुन्हा नवीन कंपनीची स्थापना केली. हिंडनबर्गच्या दणक्यानंतर आता कंपनीने वाट बदलून दुसरी चाल खेळली आहे.

Gautam Adani : रात्रीतूनच उभारली अदानी समूहाने नवीन कंपनी, या क्षेत्रात आजमवणार नशीब
Gautam Adani
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 4:35 PM

नवी दिल्ली : भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) आणि अदानी समूह (Adani Group) गेल्या तीन महिन्यापासून वादळाच्या गर्तेत अडकला आहे. या समूहात आणि गुंतवणूकदारांना कभी खूशी कभी गमचा अनुभव येत आहे. हिंडनबर्ग अहवालापासून अदानी समूहाची वाटचाल मंदावली आहे. 24 जानेवारी 2023 रोजी या अहवालाने समूहाचे मोठे नुकसान केले. या फटक्यातून सावरण्यासाठी समूहाने व्यापार आणि व्यवसायाची रणनीती बदलली आहे. गौतम अदानी यांनी एक महिन्यापूर्वी मार्च महिन्यात अदानी इलेक्ट्रिसिटी औरंगाबाद लिमिटेड नावाने कंपनी स्थापन केली होती. आता या समूहाने पुन्हा नवीन कंपनीची स्थापना केली. हिंडनबर्गच्या दणक्यानंतर आता कंपनीने वाट बदलून दुसरी चाल खेळली आहे.

फ्लॅगशिप कंपनीतंर्गत काम उद्योगपती गौतम अदानी यांनी समूहाला या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी धोरणात अमुलाग्र बदल केला आहे. नवनवीन कंपन्यांच्या मार्फत अदानी समूह आता विविध क्षेत्रात नशीब अजमावत आहे. ही व्यावसायिक रणनीती हिंडनबर्ग अहवालानंतर समूहाला तारण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्राईजेस लिमिटेडतंर्गत (Adani Enterprises Ltd)ही कंपनी सुरु करण्यात आली आहे. शेअर बाजाराला याविषयीची माहिती देण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात कंपनीची स्थापना अदानी एंटरप्राईजसने शेअर बाजारा याची माहिती दिली. ही नवीन कंपनी कोळसा धुण्याचा व्यवसाय करणार आहे. ही कंपनी अदानी एंटरप्राईजेशची उपकंपनी असेल. पेल्मा कोलियरीज (Pelma Collieries) असे या कंपनीचे नाव आहे. 7 एप्रिल रोजी नवीन कंपनी स्थापन झाली.

हे सुद्धा वाचा

या क्षेत्रात करेल काम 10 लाख रुपयांच्या प्रारंभिक अधिकृत भाग भांडवलासह आणि 5 लाख पेडअप भाग भांडवलासह ही कंपनी स्थापन करण्यात आली. याविषयीची माहिती अदानी एंटरप्राइझेशने दिली आहे. Pelma Collieries कोळसा हाताळणी प्रणालीत काम करेल. कोल वॉशरीज बांधण्याचा आणि चालवण्याचा व्यवसाय ही करण्यात येईल. ही कंपनी लवकरच कामाला सुरुवात करणार असल्याचे अदानी समूहाने स्पष्ट केले.

अदानी समूहावर कर्जाचा डोंगर हे नवीन वर्ष, 2023 गौतम अदानी आणि त्यांच्या समूहासाठी अत्यंत वाईट ठरले. हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालाने त्यांचे पंख कापल्या गेले. गुंतवणूकदारांनी या समूहातून गुंतवणूक काढण्याचा सपाटा लावला. अद्यापही हा समूह या धक्क्यातून सावरला नाही. अदानी समूहावर 30 सप्टेंबर 2022 पर्यंत 24.1 दशलक्ष डॉलरचे कर्ज असल्याची चर्चा आहे. काही मीडियातील रिपोर्टनुसार हा आकडा 40 दशलक्ष डॉलरच्या घरात आहे.

Non Stop LIVE Update
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?.
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला.
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा.
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?.
जप्तीनंतर भेट; लवकरच शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांचा भाजपात प्रवेश?
जप्तीनंतर भेट; लवकरच शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांचा भाजपात प्रवेश?.
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.