AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI च्या ग्राहकांनो लक्ष द्या! ‘या’ दिवशी महत्वाची सेवा बंद राहणार, वाचा…

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. SBI ने सोशल मीडियावर पोस्ट करत उद्या म्हणजे 4 सप्टेंबर रोजी काही तासांसाठी मोबाईल बँकिंग सेवा बंद राहणार असल्याची माहिती दिली आहे.

SBI च्या ग्राहकांनो लक्ष द्या! 'या' दिवशी महत्वाची सेवा बंद राहणार, वाचा...
SBI yono
| Updated on: Sep 03, 2025 | 7:18 PM
Share

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. SBI ने सोशल मीडियावर पोस्ट करत उद्या म्हणजे 4 सप्टेंबर रोजी काही तासांसाठी मोबाईल बँकिंग सेवा बंद राहणार असल्याची माहिती दिली आहे. याचा बँकेच्या 44 कोटी ग्राहकांना फटका बसणार आहे. किती वाजता आणि किती तासांसाठी एसबीआयची ही सेवा बंद राहणार आणि ग्राहकांसाठी या काळात पर्याय काय आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

एक तासासाठी योनो सेवा बंद राहणार

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, बँकेची YONO सेवा 4 सप्टेंबर रोजी मध्यरात्री म्हणजेच आज रात्री उशिरा 12:30 ते 1:30 या कालावधीत एका तासासाठी बंद राहणार आहे. या काळात ग्राहक योनो अॅपवर मिळणाऱ्या सेवा वापरू शकणार नाहीत. त्यामुळे ग्राहकांना त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. मात्र या काळात बँकेच्या इतर सेवा मात्र सुरु राहणार आहेत.

ग्राहकांवर काय परिणाम होणार

रात्री 12.30 ते 1.30 या कालावधीत ग्राहक ग्राहक मनी ट्रान्सफर आणि इतर सेवा वापरू शकणार नाहीत. या काळात तुम्हाला पैशांची आवश्यकता असेल तर काळजी करू नका. या काळात ATM मधून पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे. तसेच या काळात UPI Lite वर कोणताही परिणाम होणार नाही. याद्वारे तुम्ही ‘ऑन-डिव्हाइस वॉलेट’ द्वारे व्यवहार करू शकता. अशा व्यवहारासाठी बँक खात्याशी कनेक्ट करण्याची आवश्यकता नसते. मात्र ही सेवा वापरण्यासाठी तुम्हाला आधी तुमच्या वॉलेटमध्ये पैसे जमा करावे लागणार आहेत.

टोल फ्री क्रमांकाद्वारे मदत मिळणार

ग्राहक SBI च्या टोल फ्री क्रमांक 18001234 आणि 18002100 वर कॉल करून बँक संबंधित कामे करू शकता. तसेच SBI संपर्क केंद्राद्वारे सेवा मिळवू शकता. ग्राहकांना या काळात त्रासाचा सामना करावा लागू नये म्हणून बँकेने ही सुविधा दिली आहे. यामुळे ग्राहकांची गैरसोय टळणार आहे.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.