Amazon चे फाऊंडर जेफ बेजोस यांचा अंबानी स्टाईल विवाह, 90 प्रायव्हेट जेट्स-वॉटर टॅक्सी, पण लग्नाला होतोय विरोध
Amazonचे संस्थापक आणि जगातील चौथे श्रीमंत अब्जाधीश जेफ बेजोस या वयात पुन्हा बोहल्यावर चढणार आहेत. ते पत्रकार लॉरेन सांचेज हिच्याशी इटलीच्या व्हेनिसमध्ये लग्न करणार आहेत. परंतू स्थानिकांना या विवाहाला विरोध केला आहे.

Amazon चे संस्थापक आणि अब्जाधीश Jeff Bezos यांच्या विवाहामुळे सध्या चर्चेत आहेत. जेफ अमेरिकन पत्रकार Lauren Sanchez हिच्याशी रेशीमगाठ बांधणार आहेत. जेफ यांचा हा दुसरा विवाह आहे. इटलीच्या व्हेनिस शहरात हा विवाह होत असून त्यासाठी 500 कोटी रुपये केवळ आयोजनावरच खर्च होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.परंतू या विवाहाला काही जणांनी विरोधही केला आहे. इटलीचे लोक या विवाहाला का विरोध करत आहेत हे पाहूयात….
का होत आहे विरोध?
ग्रीनपीस (Greenpeace) नावाच्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण संघटनेने अब्जाधीश जेफ बेजोस यांच्यावर कर चोरीचा आरोप करीत त्यांच्याकडून ‘poverty wages’ (निर्धनता वेतन) देण्याची मागणी केली आहे. या संघटनेने जेफ यांच्या विवाहाला विरोध करण्यासाठी निदर्शने आयोजित केली आहेत. या संघटनेने एक बॅनर झळकवले आहे. या बॅनरवर लिहीले आहे की तुम्ही तुमच्या लग्नासाठी तर व्हेनिस शहर भाड्याने घेऊ शकता तर तुम्ही जादा टॅक्स देखील भरु शकता. ग्रीनपीस संघटनेने इंस्टाग्रामवर निदर्शनांचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. जेफ बेजोस यांची होणारी वधू लॉरेन सांचेज देखील निदर्शकांच्या निशाण्यावर आहे. सांचेज म्हणाली की मी जलवायु परिवर्तन आणि पर्यावरण रक्षणासाठी लढायला तयार आहे. परंतू एप्रिलमध्ये ती जेफ बेजोस यांची स्पेस कंपनी ब्लू ओरिजिनच्या रॉकेटमधून अंतराळयात्रेवर गेली होती.
ग्रीनपीसच्या निदर्शनासह व्हेनिसमध्ये व्यापक स्थानिय विरोध देखील पाहायला मिळत आहे. या हायप्रोफाईल विवाहामुळे व्हेनिस शहर ब्लॉक केले जाणार आहे. बातमीनुसार येत्या काही दिवसात येत्या काही दिवसात व्हेनिस आणि आजूबाजूच्या विमानतळांवर उदा. ट्रेव्हीसो आणि वेरोनामध्ये जवळपास ९० खाजगी जेट्स उतरणार आहेत. पाहुण्यांसाठी ३० वॉटर टॅक्सी बुक करण्यात आल्या आहेत.
472 कोटी रुपये खर्च होणार
रॉयटर्सच्या बातमीनुसार या लग्नसोहळ्यावर एकूण 40 ते 48 मिलियन यूरो म्हणजे 472 कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. परंतू मीडिया रिपोर्टनुसार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहावर तर 5000 कोटी रुपये खर्च झाले होते. इटलीचे वृत्तपत्र Corriere della Sera आणि समाचार एजन्सी ANSA बातमीनुसार, जेफ हे मोठा दानधर्मही करणार आहेत. ज्यात 1 मिलियन यूरो म्हणजे सुमारे 10 कोटी रुपये CORILA नावाच्या एका संस्थेला दिली जाणार आहे. ही संस्था व्हेनिसच्या तलावाच्या इकोसिस्टमवर रिसर्च करत आहे.
प्रमुख पाहुण्यांची रेलचेल
व्हेनिसमध्ये आयोजित या भव्य लग्नसमारंभाला जगभरातील नामिगिरामी हस्ती येणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्प तिच्या पती सोबत व्हेनिसला पोहचली आहे. टेक दिग्गज मार्क झुकरबर्ग पासून ते बिल गेट्सपर्यंत सर्व अब्जाधीय या लग्न सोहळ्याला उपस्थित असणार आहेत. हॉलीवुड स्टार लिओनार्डो डिकाप्रिओ, फॅशन आयकॉन किम कार्दशियन, डायने वॉन फस्टेनबर्ग हे सुद्धा येण्याची शक्यता आहे.
