अनिल अंबानींनी बँकेचे कर्ज फेडण्यासाठी बँकेलाच विकले हेड ऑफिस, कितीला सौदा झाला?

अनिल अंबानी यांनी Reliance infrastructure चे मुंबई येथील मुख्य कार्यालय येस बँकेला 1200 कोटी रुपयांना विकले आहे. (anil ambani reliance infrastructure yes bank)

अनिल अंबानींनी बँकेचे कर्ज फेडण्यासाठी बँकेलाच विकले हेड ऑफिस, कितीला सौदा झाला?
अनिल अंबानी

मुंबई : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले उद्योगपती अनिल अंबानी (Anil ambani) यांनी मोठा निर्णय घेतला आहे.  कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी येस बँकेला (Yes bank) आपले हेड ऑफिस विकले  आहे. त्यांनी Reliance infrastructure चे मुंबई येथील मुख्य कार्यालय येस बँकेला 1200 कोटी रुपयांना विकले आहे. कंपनीने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार या व्यवहारातून आलेल्या पैशांचा उपयोग हा येस बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी केला जाईल. यापूर्वी 2020 मधील जुलै महिन्यातच येस बँकेने रिलायंस ईन्फ्राच्या मुख्यालयावर कब्जा केला होता. त्यानंतर रिलायंस ईन्फ्राने कार्यालय विकल्याची अधिकृतपणे घोषणा आज केली. (Anil Ambani sold his Reliance Infrastructure officer of Mumbai to Yes bank)

अनिल अंबानी यांच्या रिलायंस इंफ्रा कंपनीवर असलेल्या 2,892 कोटी रुपयांच्या वसुलीकरीता बँकेना वित्तीय कारवाई केली होती. कोणत्याही बँकेला एखाद्याच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करायची असेल तर त्याआधी दोन महिने नोटीस द्यावी लागते. ही प्रक्रिया बँकेने याआधीच पार पडली होती. त्यानंतर दबाव वाढल्यामुळे अधिकृतपणे अंबानी यांच्या कंपनीने मुख्य कार्यालय विकल्याचे जाहीर केले.

Reliance infrastructure वर कर्ज किती ?

मुकेश अंबानी यांचे भाऊ अनिल अंबानी यांच्या रिलायंस इन्फ्राटेल या कंपनीवर वेगवेगळ्या बँकेचे एकूण 3515 कोटी रुपयांचे कर्ज आहे. या कर्जाची इन्फ्राटेलला परतफेड करायची आहे. त्यासाठी अनिल अंबानी यांनी मुकेश अंबानी यांची बऱ्याच प्रमाणात मदत झाली होती. त्यासाठी NCLT ने रिलायंस इन्फ्राटेल या अनिल अंबानी यांच्या कंपनीसाठी एक रिजॉल्यूशन प्लॅन तयार केला होता. या योजनेंतर्गत मुकेश अंबानी यांच्या जिओने रिलायंस इन्फ्राचे जवळपास 4400 कोटी रुपयांचे असेट्स खरेदी केले होते. 2020 च्या डिसेंबर महिन्यात हा व्यवहार झाला होता. हा व्यवहार झाल्यानंतर रिलायंस इन्फ्रा या कंपनीचे टेलिकॉम टॉवर आणि फायबर असेट्स जिओ कंपनीला मिळाले होते.

सर्व कर्जाची परतफेड करणार

दरम्यान, अनिल अंबानी यांच्या कंपनीवर कोटींनी कर्ज असले तरी, आगामी काळात आम्ही बँकांचे पूर्ण कर्ज फेडू असे आश्वासन रिलायंस इन्फ्राने दिलेले आहे. याविषयी बोलताना कंपनीच्या एका अधिकऱ्याने अधिक माहिती दिली आहे. रिलायंस ईन्फ्राटेकचे मुख्यालय विकल्यानंतर बऱ्याच अशी कर्ज कमी झाले आहे. येस बँकेचे एकूण 4,000 कोटी रुपये असलेले कर्ज आता 2,000 रुपयांवर आले आहे. 2021 च्या शेवटपर्यंत कंपनीचे सर्व कर्ज फिटलेले असेल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

इतर बातम्या :

आता एटीएम कार्डची गरज नाही, मोबाईलद्वारेच पैसै काढता येणार, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Gold Silver Price Today : आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सोने चांदीच्या किंमती वाढल्या, वाचा आजचे ताजे दर

GST Collection मध्ये बंपर उसळी, मार्चमध्ये जीएसटीचा इतिहासातील सर्वाधिक कर वसूल

(Anil Ambani sold his Reliance Infrastructure officer of Mumbai to Yes bank)

Published On - 7:31 pm, Thu, 1 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI