AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कधी पडेल उभी फूट, जाणून घ्या भावातील अपडेट

Petrol Diesel Rate Today : राज्यात अपेक्षेप्रमाणे वर्षात दुसरा पक्ष फुटला. जनतेच्या विकासासाठी फाटाफूट सुरु असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण नागरिकांच्या खिशावरील ओझं, महागाई तसूभरपण कमी झाली नाही. काय आहेत आजची किंमत..

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कधी पडेल उभी फूट, जाणून घ्या भावातील अपडेट
भाव काय
| Updated on: Jul 04, 2023 | 8:35 AM
Share

नवी दिल्ली : रविवारपासून राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यात अपेक्षेप्रमाणे, राजकीय विश्लेषकांच्या, काही नेत्यांच्या भाकिताप्रमाणे दुसरा पक्ष पण फुटला. जनतेच्या विकासासाठी फाटाफूट होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण सर्वसामान्यांच्या खिशावरील ओझे तसूभरपण कमी झालेले नाही. महागाईने तर नागरिकांचे गणित चौपट करुन टाकले आहे. इंधनाच्या वाढीव दराने जनता हैराण झाली आहे. पेट्रोलियम कंपन्या मालामाल झाल्या आहेत. राज्य आणि केंद्र सरकार इंधनावरील कर आकारणीमुळे धाकड झाले आहेत. त्यांना रोजचा हजारो कोटींचा महसूल मिळत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) कमी करण्याचे दर तीन महिन्यांनी गाजर तेवढे दाखवले जाते. आजचा इंधनाचा ताजा भाव असा आहे..

सकाळीच भाव अपडेट भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी सकाळीच पेट्रोल-डिझेलचा भाव अपडेट केले आहे. सकाळी 6 वाजता इंधनाच्या किंमती जाहीर केल्या आहेत. कंपन्या दररोज इंधनाचे दर जाहीर करतात. जून 2017 पूर्वी 15 दिवसांनी इंधनाच्या किंमती अपडेट करण्यात येत होत्या. हे भाव पुढील 15 दिवसांसाठी कायम राहत असत.

कच्चा तेलात चढउतार जागतिक बाजारात कच्चा तेलात चढउतार आहे. 4 जुलै रोजी ब्रेंट क्रूड ऑईल 74.87 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. तर डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलचा भाव 70.05 डॉलर प्रति बॅरल झाला. हे दर गेल्यावर्षीपेक्षा कमी आहेत.

गेल्यावर्षी किंमती गगनाला रशिया-युक्रेन युद्ध भडकल्यानंतर मार्च 2022 मध्ये क्रूड ऑईलच्या किंमती गगनाला भिडल्या. किंमती प्रति बॅरल 140 डॉलरवर पोहचल्या होत्या. नवीन वर्षात,2023 मध्ये कच्चा तेलाने मोठी उसळी घेतली नाही. भाव एकदाच 90 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहचले. पण अनेक महिने किंमती 80 डॉलर प्रति बॅरलच्या आत आहेत.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 93.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.57 तर डिझेल 93.08 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.37 रुपये आणि डिझेल 92.91 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.44 तर डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 108 पेट्रोल आणि डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 106.42 आणि डिझेल 92.94 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 107.45 आणि डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.25 तर डिझेल 93.74 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 107.89 तर डिझेल 94.38 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.72 रुपये आणि डिझेल 93.19 रुपये प्रति लिटर
  12. परभणी पेट्रोल 109.47 तर डिझेल 95.86 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.61 आणि डिझेल 93.11 रुपये प्रति लिटर
  14. रायगड पेट्रोलचा भाव 107.11 आणि डिझेल 93.57 रुपये प्रति लिटर
  15. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.77 रुपये तर डिझेल 93.29 रुपये प्रति लिटर
  16. ठाणे पेट्रोलचा दर 105.97 रुपये तर डिझेल 92.46 रुपये प्रति लिटर

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

Follow Us
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा....
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा.....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर.....
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?.
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.