Baba Vanga Prediction: सोने तुम्हाला मालामाल करणार, बाबा वेंगाच्या त्या भविष्यवाणीने उघडणार अनेकांचे नशीब, अजून किती महागणार सोने?
Baba Vanga Predictions on Gold: बाबा वेंगाने सोन्याविषयी मोठी भविष्यवाणी केली आहे. ही भविष्यवाणी लोकांमध्ये व्हायरल झाली आहे. सध्या सोन्याचा भाव दीड लाखांवर पोहचला आहे. सोन्याने अनेकांना लखपती, करोडपती केलंय. पण सोन्याचा भाव अजून किती वाढणार? काय आहे वेंगाचं ते भाकीत?

Baba Vanga Prediction about Gold : सोन्या-चांदीच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. दिवसागणिक सोने-चांदी महाग होत आहे. त्याचवेळी बुल्गारियाची भविष्यवेत्ता बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत आली आहे. बाबा वेंगाने सोन्याविषयी, सोने दराविषयी मोठे भाकीत केले आहे. हा भाव ऐकून अनेकांन धक्का बसला आहे. कारण वेंगाच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्याचा दावा करण्यात येतो. सोन्याचा भाव किती वाढणार, किंमत किती वाढणार याविषयी वेंगाने मोठे भाकीत केले आहे. त्याची आता समाज माध्यमांवर चर्चा सुरू आहे. काय आहे तिचे ते अचंबित करणारे भाकीत?
बाबा वेंगाची भविष्यवाणी व्हायरल
बाबा वेंगाची सोन्याच्या किंमतीविषयीची भविष्यवाणी व्हायरल झाली आहे. समाज माध्यमात हे भाकीत तुफान चर्चेत आले आहे. सोन्याच्या किंमती सध्या सुसाट आहे. पण वेंगाच्या भाकिताने अनेकांच्या कपाळाला आठ्या आल्या आहेत. तर ज्यांच्याकडे भरपूर सोने आहे, त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहे. बाबा वेंगाला बाल्कन क्षेत्रातील नास्त्रेदमस असे म्हटले जाते. तिची भविष्यवाणी खूप चर्चेत आहे. तिचा जन्म बुल्गेरियात 1911 मध्ये झाला होता. तर वयाच्या 86 व्या वर्षी तिचे 1996 मध्ये निधन झाले होते.
किती महागले सोने?
गेल्या काही महिन्यात सोन्याची चमक वाढली आहे. सोन्याच्या ताज्या भावाने गुंतवणूकदारांच्या काळजाचे पाणी पाणी झाले आहे. भारतात 10 ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास 1 लाख 47 हजार रूपयांपर्यंत पोहचला आहे. त्याचदरम्यान बाबा वेंगाच्या त्या भाकिताची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. आता अनेकांना असा प्रश्न पडला आहे की बाबा वेंगाची ती भविष्यवाणी खरी ठरणार का?
किती महागणार सोने ?
बाबा वेंगाच्या व्हायरल भाकितानुसार, आर्थिक संकट हे पारंपारिक बँकिंग प्रणाली प्रभावित करू शकते. त्यामुळे अनेक लोक सोने आणि चांदीत अधिकाधिक गुंतवणूक करतील. थोडं का होईना सोने खरेदी करतील. चांदीत गुंतवणूक करतील. बाबा वेंगानं केलेल्या भाकितानुसार, सोन्याच्या किंमती जवळपास 25 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. त्यामुळे अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सध्या सोने दीड लाखांच्या घरात आहे. ही किंमत दोन लाखांच्या घरात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
सूचना : शास्त्रज्ञ बाबा वेंगाची भाकीतं मानत नाहीत. हे सर्व दावे खोटे असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. बाबा वेंगा हिची भाकीतं ही काव्यात्म आहे आणि ती फारशी लिखित नाहीत. विशेष म्हणजे ती एखाद्या प्रदेशाचं, देशाचं नाव घेऊन केलेली नाही तर या काळात अशा घटना घडू शकतात असा तिचा दावा आहे, एखाद्या ठिकाणी तशी घटना जुळून येऊ शकतात. त्यामुळे शास्त्रज्ञ तिच्या भविष्यवाणीकडे लक्ष देत नाहीत.
