AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ खाजगी बँकेने वाढवले FD चे व्याजदर, मिळणार सर्वाधिक 7.95 टक्के परतावा

खाजगी क्षेत्रातील प्रमुख बँक 'बंधन बँक' ने आपल्या मुदत ठेव (FD) व्याजदरात मोठी वाढ केली आहे. या नवीन व्याजदर रचनेनुसार, ज्येष्ठ नागरिकांना ठराविक कालावधीच्या एफडीवर आता तब्बल 7.95 टक्क्यांपर्यंत सर्वाधिक परतावा मिळणार आहे. सुरक्षित गुंतवणूक आणि चांगल्या उत्पन्नाचा शोध घेणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी बँकेचे हे डिजिटल अपडेट अतिशय फायदेशीर ठरणार आहे.

'या' खाजगी बँकेने वाढवले FD चे व्याजदर, मिळणार सर्वाधिक 7.95 टक्के परतावा
fd in bankImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 25, 2026 | 10:00 PM
Share

फिक्स डिपॉझिट (FD) मध्ये पैसे गुंतवून हमखास नफा मिळवू इच्छिणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. बंधन बँकेने नवीन एफडी पॉलिसी जाहीर करत व्याजदरांमध्ये आकर्षक वाढ केली आहे. बँकेच्या ऑनलाईन पोर्टल किंवा मोबाईल ॲपवरून केवळ काही मिनिटांत गुंतवणूक करून ज्येष्ठ नागरिक आता 7.95 टक्के व्याजदराचा थेट फायदा घेऊ शकतात.

तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि बँक एफडीमध्ये पैसे गुंतवण्यासाठी सर्वोत्तम बँक एफडी शोधत असाल तर तुम्ही तुमचे पैसे बंधन बँकेच्या एफडीमध्ये गुंतवू शकता. वास्तविक, खासगी बँक बंधन बँकेने आपल्या अल्प मुदतीच्या एफडीचे व्याजदर वाढवले आहेत आणि नवीन दर जारी केले आहेत. अशा परिस्थितीत, आता तुम्ही बंधन बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक करून जास्त व्याजदराने परतावा मिळवू शकता. चला जाणून घेऊया सविस्तर माहिती.

बंधन बँक एफडीचे नवे व्याजदर

बंधन बँकेने 20 जून 2026 पासून नवीन एफडी व्याजदर लागू केले आहेत. बँकेने निवडक कालावधीच्या एफडी योजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.95 टक्के व्याज दरात 20 बेसिस पॉईंट (0.20 टक्के) वाढ केली आहे. त्याच वेळी, सामान्य नागरिकांसाठी जास्तीत जास्त व्याज दर 7.45 टक्के आहे.

सामान्य नागरिकांसाठी व्याजदर खालीलप्रमाणे आहेत

1 वर्ष – 7 टक्के 2 वर्ष – 7.45 टक्के 3 वर्षे – 7.25 टक्के 4 वर्ष – 7.25 टक्के 5 वर्ष – 5.85 टक्के

ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर खालीलप्रमाणे आहेत

1 वर्ष – 7.50 टक्के 2 वर्ष – 7.95 टक्के 3 वर्ष – 7.75 टक्के 4 वर्ष – 7.75 टक्के 5 वर्षे – 6.60 टक्के

बंधन बँक बचत खाते

बँक एफडीबरोबरच बंधन बँकेच्या बचत खात्याचे व्याजदरही खूप आकर्षक आहेत. बँक 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतच्या बचतीवर वार्षिक 6.50 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, 10 लाख रुपयांपेक्षा जास्त बॅलन्सवर वेगवेगळ्या स्लॅबनुसार व्याजदर निश्चित करण्यात आले आहेत, जे 5.35 टक्क्यांवरून 6 टक्क्यांपर्यंत जातात.

बँकेची निवड काळजीपूर्वक करा

सरकारी आणि मोठ्या खाजगी बँका: SBI, HDFC, ICICI, आणि Axis बँका अत्यंत सुरक्षित मानल्या जातात, जरी त्यांचे व्याजदर थोडे कमी असले तरी.

स्मॉल फायनान्स बँका: जास्त व्याज मिळवण्यासाठी (उदा. 8 टक्के ते 8.5 टक्के) तुम्ही सूर्योदय किंवा इक्विटास सारख्या स्मॉल फायनान्स बँका निवडू शकता.

सुरक्षिततेचा नियम: आरबीआयच्या नियमांनुसार, प्रत्येक बँकेत 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना (मुद्दल + व्याज) ‘DICGC’ चे विमा संरक्षण असते. त्यामुळे कोणत्याही एका बँकेत 5 लाख रुपयांपेक्षा जास्त एफडी करू नका.

‘एफडी लॅडरिंग’ पद्धत वापरा

सर्व पैसे एकाच एफडीमध्ये अडकवून ठेवण्याऐवजी पैशांचे 3 किंवा 4 भाग करा. उदा. जर तुमच्याकडे 4 लाख रुपये असतील, तर 1 लाख रुपयांची 1 वर्षासाठी, 1 लाखाची 2 वर्षांसाठी, 1 लाखाची 3 वर्षांसाठी आणि 1 लाखाची 4 वर्षांसाठी अशी वेगळी एफडी करा. यामुळे दरवर्षी तुमची एक एफडी मॅच्युअर (पूर्ण) होत राहील आणि तुम्हाला कधीही पैशांची नड पडणार नाही, तसेच व्याजाचा दर वाढल्यास नवीन दराचा फायदा घेता येईल.

Follow Us
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर...
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
Mumbai Ganpati Visarjan | गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू; आणखी विलंब होण्याची...
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू... आणखी विलंब होण्याची शक्यता, नेमकं कारण समोर
गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
आजच्या मोहिमेत जवळपास 3 हजार... गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना..
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना आणखी उशिर
मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
Lalbag Cha Raja : मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप