AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टॅक्स, बँकिंग, सिलेंडरचे दर; 1 जुलैपासून मोठ्या बदलांची शक्यता, जाणून घ्या सर्वकाही

Changes in Rules from 1st July 2021: नव्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक महत्वाच्या गोष्टींमध्ये मोठे बदल होऊ घातले आहेत.

टॅक्स, बँकिंग, सिलेंडरचे दर; 1 जुलैपासून मोठ्या बदलांची शक्यता, जाणून घ्या सर्वकाही
1 जुलैपासून बदलांची शक्यता
| Edited By: | Updated on: Jun 30, 2021 | 7:29 AM
Share

Changes in Rules from 1st July 2021: नव्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक महत्वाच्या गोष्टींमध्ये मोठे बदल होऊ घातले आहेत. सगळ्याच बदलांची अंमलबजावणी तातडीने होणार नसली तरी आगामी महिन्यातील काही निर्णयांमुळे तुम्हाला आर्थिक नियोजनाचा नव्याने विचार करायची गरज भासू शकते. जुलै महिन्यात टॅक्स, बँकिंग, सिलेंडरचे दरात बदल होण्याची शक्यता आहे. (Changes in Rules from 1st July 2021)

SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाचा निर्णय

येत्या 1 जुलैपासून एसबीआय बँकेतून पैसे काढताना विचार करावा लागणार आहे. तसेच धनादेशाचा वापर करण्यासाठीही तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागतील. बँकेतून एका महिन्यात चारपेक्षा जास्तवेळा पैसे काढल्यास शुल्क भरावे लागेल. यामध्ये एटीएममधून काढण्यात येणाऱ्या पैशांचाही समावेश आहे. चारपेक्षा जास्तवेळा पैसे काढल्यास प्रत्येक व्यवहारावर 15 रुपये आणि जीएसटी असे शुल्क अदा करावे लागेल. बचत खात्यासाठी सेवा कर भरावा लागेल.

1 जुलैपासून IFSC कोड बदलणार, जुनं चेकबुक रद्द होणार

काही दिवसांपूर्वीच सिंडिकेट बँकेचे (Sydicate Bank) कॅनरा बँकेत (Canera Bank) विलिनीकरण झाले होते. त्यामुळे आता बँकेच्या व्यवहारात मोठे बदल होणार आहे. परिणामी सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. कॅनरा बँकेने सिंडिंकेट बँकेचा IFSC कोड बदलला असून नवा कोड 1 जुलैपासून वापरात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला जुन्या चेकबुकचा वापर करून व्यवहार करायचे असल्यास फक्त दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यानंतर सिंडिकेट बँकेचे चेकबुक हे निरुपयोगी ठरेल.

TDS आणि TCS करात वाढ

गेल्या आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न न भरणाऱ्यांना 1 जुलैपासून जादा TDS, TCS कर भरावा लागणार आहे. वार्षिक टीडीएस 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असणाऱ्यांना हा नियम लागू होईल.

घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ होणार?

पेट्रोल आणि डिझेलपाठोपाठ आता घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून जुलै महिन्यात यासंदर्भातील निर्णय घेतला जाऊ शकतो.

अल्पबचत योजनांचा व्याजदर घटणार?

काही महिन्यांपूर्वी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमुळे लांबवणीवर पडलेल्या अल्पबचत योजनांवरील (Small Saving Schemes) व्याजदर कपातीच्या निर्णयाची मोदी सरकारकडून आता अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. मात्र, आता मोदी सरकार 1 जुलैपासून अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कपात करू शकते. गेल्यावर्षी केंद्र सरकारकडून बँकांमधील मुदत ठेव योजनांवरील व्याजदर कमी करण्यात आले होते. त्यानंतर आता अल्पबचत योजनांवरील व्याजदर घटल्यास सामान्य गुंतवणुकदारांच्या चिंता वाढणार आहेत.

संबंधित बातम्या:

एसबीआयचा नवा नियम; 1 जुलैपासून चार कॅश विथड्रॉलनंतर शुल्क आकारणार, जाणून घ्या अधिक माहिती

प्रत्येकाला चेकद्वारे पेमेंट देता? मग जाणून घ्या हा नियम, अन्यथा द्यावा लागेल अतिरिक्त चार्ज

एसबीआय, एचडीएफसीसह या बँकांनी वाढविली मुदत, आता 30 सप्टेंबरपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना मिळणार अधिक व्याज

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.