ऐन दिवाळीच्या तोंडावर 6 दिवस बँका बंद राहणार

ऑक्टोबर महिना संपायला आता फक्त 14 दिवस उरले आहेत (Banks Closed). मात्र, या 14 दिवसांमध्ये देशातील वेगवेगळ्या ठिकाणी अनेक बँका बंद राहणार आहेत. या 14 दिवसांपैकी सहा दिवस बँकेचं कामकाज होणार नाही

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:20 PM, 17 Oct 2019
ऐन दिवाळीच्या तोंडावर 6 दिवस बँका बंद राहणार
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये फिक्स डिपॉझिट ठेवलेलं असेल तर 1 ऑगस्टपासून त्याचा मोबदला कमी मिळेल. एसबीआयने 179 दिवसांच्या जमा ठेवीवर व्याज दरात 0.5 ते 0.75 टक्क्यांनी कपात केली आहे. तर दीर्घ कालावधीच्या जमा ठेवीसाठी 0.20 टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय बँकेने घेतलाय.

मुंबई : ऑक्टोबर महिना संपायला आता फक्त 14 दिवस उरले आहेत (Banks Closed). मात्र, या 14 दिवसांमध्ये देशातील वेगवेगळ्या ठिकाणी अनेक बँका बंद राहणार आहेत. या 14 दिवसांपैकी सहा दिवस बँकेचं कामकाज होणार नाही (Bank Strike). त्यामुळे जर तुमचं बँकेचं कुठलं महत्त्वाचं काम राहिलं असेल तर ते लगेच करुन घ्या.

31 ऑक्टोबरपूर्वी वेगवेगळ्या कारणांसाठी देशातील अनेक बँका बंद राहातील (Bank Holidays in October). न्यू एजन्सी पीटीआयनुसार, 10 बँकांच्या विलिनीकरणाविरोधात 22 ऑक्टोबरला बँक संघटनेने संप पुकारला आहे.

अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटना आणि भारतीय रिझर्व्ह बँक कर्मचारी परिसंघाच्या या संपाला आता ट्रेड युनिअन काँग्रेस (एटक) ने ही समर्थन दिलं आहे. जर हा संप झाला तर 22 ऑक्टोबरला बँका बंद राहातील.

काही दिवसांपूर्वी सरकारने 10 बँकांच्या विलिनीकरणाची घोषणा केली होती. या विलिनीकरणानंतर 4 नव्या बँक अस्तित्वात येतील. तर आंध्र बँक, इलाहबाद बँक, सिंडिकेट बँक, कॉर्पोरेशन बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या अस्तित्वात राहणार नाही.

22 ऑक्टोबरपूर्वी 20 ऑक्टोबरला रविवार असल्याने बँकांना सुट्टी आहे. तर 26 ऑक्टोबरला चौथा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असणार आहे. म्हणजेच दिवाळीपूर्वी (27 ऑक्टोबर) तीन दिवस बँका बंद राहातील. त्यानंतर 27 ऑक्टोबरला दिवाळी आणि रविवार असल्याने बँकेचं कामकाज बंद राहील.

दिवाळीनंतर 28 ऑक्टोबरला गोवर्धन पुजा आहे. त्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये बँका बंद असतील. तसेच, 29 ऑक्टोबरला भाऊबीज असल्याने बँकांचं काम बंद राहील.