AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भूतानमध्ये 5 हजार मेगावॅटचा जलविद्यूत प्रकल्प; भूतान सरकार आणि अदानी समूहात सामंजस्य करार

भूतानच्या ड्रुक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन (DGPC) आणि भारतातील अदानी समूहाने संयुक्तपणे 5 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यासाठी करार केला आहे. यात वांगचू जलविद्युत प्रकल्पाचा समावेश आहे, ज्यात DGPC ची 5 टक्के आणि अदानीची 49 टक्के भागीदारी असेल. हा प्रकल्प भूतानच्या ऊर्जा गरजा पूर्ण करेल आणि प्रादेशिक सहकार्याला बळ देईल.

भूतानमध्ये 5 हजार मेगावॅटचा जलविद्यूत प्रकल्प; भूतान सरकार आणि अदानी समूहात सामंजस्य करार
Prime Minister Dasho Tshering TobgayImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 08, 2025 | 7:25 PM
Share

भूतानमध्ये लवकरच जलविद्यूत प्रकल्प साकारणार आहे. भूतानच्या ड्रुक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन (DGPC) आणि भारतातील अदानी समूहाने संयुक्तपणे भूतानमध्ये 5 हजार मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यासाठी ऐतिहासिक सामंजस्य करार (MoU) केला आहे. त्यामुळे भूतानमध्ये विजेची समस्या मार्गी लागणार आहे.

थिंपु येथे DGPC चे व्यवस्थापकीय संचालक दशो छेवांग रिनझिन आणि अदानी ग्रीन हायड्रो लिमिटेडचे मुख्य परिचालन अधिकारी (PSP आणि हायड्रो) नरेश तेलगु यांनी स्वाक्षऱ्या करून हा करार केला. या वेळी भूतानचे पंतप्रधान दशो त्शेरिंग टोबग्ये, ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधन मंत्री ल्योंपो गेम त्शेरिंग तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

या सामंजस्य करारातून 570/900 मेगावॅट वांगचू जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भागीदारीला बळ मिळणार आहे. या प्रकल्पात DGPC ची 51 टक्के बहुसंख्य हिस्सेदारी असेल तर अदानी समूहाची 49 टक्के हिस्सेदारी असेल. 5 हजार मेगावॅट क्षमतेची व्यापक योजना इतर जलविद्युत आणि पंप स्टोरेज प्रकल्पांचा समावेश करेल, ते आयडेंटिफाय केले जातील, सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाईल आणि टप्प्याटप्प्याने राबवला जाईल.

आमच्या दृढ वचनबद्धतेचं प्रतिक

हा करार स्वच्छ ऊर्जा पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या आणि प्रादेशिक ऊर्जा सुरक्षिततेला बळकटी देणाच्या आमच्या दृढ वचनबद्धतेचे प्रतिक आहे, असे नरेश तेलगु यांनी सांगितले. DGPC सोबत आम्ही भूतानच्या जलविद्युत क्षमतेचा उपयोग करत भारताला विश्वासार्ह हरित ऊर्जा निर्यात करण्यासाठी एकत्र काम करत आहोत. हा प्रादेशिक सहकार आणि टिकावू विकासाच्या दिशेने एक प्रभावी पाऊल आहे, असंही नरेश तेलगु यांनी सांगितलं.

भारत-भूतान मैत्रीचे आधारस्तंभ

अदानी समूहासोबतची ही भागीदारी भारत सरकारसोबतच्या आमच्या घनिष्ठ सहकार्याला अधिक बळ देते. जलविद्युत विकास हे भारत-भूतान मैत्रीचे आधारस्तंभ आहे, असे DGPC चे एमडी दशो छेवांग रिनझिन यांनी सांगितले.“आम्ही अदानी समूहाच्या जागतिक यशातून शिकण्याची आणि ही भागीदारी पुढे नेण्याची अपेक्षा करतो, असंही ते म्हणाले.

DGPC हे भूतानमधील अग्रगण्य जलविद्युत प्रकल्प विकासक आहेत. डीजीपीसी देशाच्या स्वच्छ ऊर्जा वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. देशांतर्गत ऊर्जा सुरक्षिततेसह प्रादेशिक सहकार्यालाही चालना देण्याचं काम डीजीपीसी करत आहे.

भूतानची ऊर्जा क्षमता वाढणार

अदानी समूह भारतातील आघाडीचा पायाभूत आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाचा प्लेअर आहे. प्रकल्प विकास, वित्तपुरवठा व बाजारपेठांमध्ये प्रवेश अशा अनेक बाबतीत अदानी समूहाचे प्राविण्य आहे. हा समूह भूतानला त्याची जलविद्युत क्षमता वाढवण्यास आणि भारतीय ऊर्जा बाजारात प्रवेश मिळवून देण्यास मदत करणार आहे.

या सहकार्याचा भाग म्हणून अदानी समूह भारताच्या वाणिज्यिक वीज बाजारासोबतची एकात्मता सुनिश्चित करणार आहे आणि भूतानच्या प्रादेशिक ऊर्जा व्यापारातील भूमिकेला बळ देईल. हा उपक्रम भूतान आणि भारत सरकारकडून पूर्ण पाठिंब्याने राबवला जाणार असून स्वच्छ ऊर्जा वाढीच्या तसेच आर्थिक एकत्रिकरणाच्या सामायिक दृष्टिकोनाशी सुसंगत असणार आहे.

ही योजना भूतानच्या 2040 पर्यंत 20 हजार मेगावॅट अतिरिक्त उत्पादन क्षमतेचे उद्दिष्ट असलेल्या “नवीन ऊर्जा रोडमॅप” शी सुसंगत आहे. या रोडमॅपमध्ये सौर आणि भूतलतापीय ऊर्जेतील विविधीकरणावर भर दिला आहे आणि गुंतवणूक व नवकल्पनांसाठी धोरणात्मक भागीदारीस प्रोत्साहन दिले आहे. या भागीदारीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणून, DGPC आणि अदानी यांनी वांगचू प्रकल्पासाठी भागधारक करारावरही सह्या केल्या आहेत. ते भूतानच्या जलविद्युत क्षेत्राच्या विकासात महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.