AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! सरकारने 12 औषधे केली स्वस्त, NPPA ने उचलले मोठे पाऊल

या औषधांमध्ये 1 मिलीग्राम ग्लिमेपिराइड टॅब्लेटचा समावेश आहे, ज्याची किंमत 3.6 रुपये प्रति टॅब्लेट आहे. त्याच्या 2 एमजीसाठी कमाल मर्यादा 5.72 रुपये प्रति टॅबलेट ठेवण्यात आली. 25 टक्के ताकदीच्या 1 मिली ग्लुकोज इंजेक्शनची कमाल किंमत 17 पैसे ठेवण्यात आली. तर, 1 मिली इन्सुलिन इंजेक्शनची कमाल किंमत 15.09 रुपये असेल.

मोठी बातमी! सरकारने 12 औषधे केली स्वस्त, NPPA ने उचलले मोठे पाऊल
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Oct 25, 2021 | 6:50 PM
Share

नवी दिल्लीः Medicine Prices: औषध किंमत नियामक नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने सोमवारी 12 मधुमेह विरोधी जेनेरिक औषधांसाठी कमाल मर्यादा किमती निश्चित केल्यात. यात ग्लिमेपिराइड गोळ्या, ग्लुकोज इंजेक्शन आणि इंटरमीडिएट अॅक्टिंग इन्सुलिन सोल्युशन यांचा समावेश आहे, असंही त्यांनी सांगितलं. एका ट्विटमध्ये औषध किंमत नियामकाने म्हटले आहे की, प्रत्येक भारतीयाला मधुमेहासारख्या आजारांवर उपचार करणे शक्य होण्यासाठी NPPA ने 12 मधुमेह विरोधी जेनेरिक औषधांच्या किमती कमी करण्यासाठी पाऊल उचलले.

औषधाची किंमत किती होती?

या औषधांमध्ये 1 मिलीग्राम ग्लिमेपिराइड टॅब्लेटचा समावेश आहे, ज्याची किंमत 3.6 रुपये प्रति टॅब्लेट आहे. त्याच्या 2 एमजीसाठी कमाल मर्यादा 5.72 रुपये प्रति टॅबलेट ठेवण्यात आली. 25 टक्के ताकदीच्या 1 मिली ग्लुकोज इंजेक्शनची कमाल किंमत 17 पैसे ठेवण्यात आली. तर, 1 मिली इन्सुलिन इंजेक्शनची कमाल किंमत 15.09 रुपये असेल. त्याचप्रमाणे 40 IU/ml ताकद असलेल्या 1 मिली इंटरमीडिएट अॅक्टिंग (NPH) सोल्यूशन इन्सुलिन इंजेक्शनची कमाल किंमत 15.09 रुपये निश्चित करण्यात आली. तर 40 IU/ml शक्तीचे 1 ml प्रिमिक्स इन्सुलिन 30:70 इंजेक्शनची किंमत देखील 15.09 रुपये आहे.

टॅब्लेटची कमाल किंमत प्रति टॅब्लेट 1.51 रुपये निश्चित करण्यात आली

एनपीपीएने पुढे सांगितले की, 500 ताकदीच्या मेटफॉर्मिन तत्काळ रिलीझ टॅब्लेटची कमाल किंमत प्रति टॅब्लेट 1.51 रुपये निश्चित करण्यात आली. तर 750 मिग्रॅ औषधाची किंमत प्रति टॅबलेट 3.05 रुपये आणि 1,000 मिलिग्रॅम ताकदीची किंमत 3.61 रुपये प्रति टॅब्लेट असेल. 1000 मिलीग्राम ताकद असलेल्या मेटफॉर्मिन कंट्रोल रिलीज टॅब्लेटची कमाल किंमत 3.66 रुपये असेल. या व्यतिरिक्त या औषधाची किंमत प्रति टॅब्लेट 2.4 रुपये आहे, ज्यात 750 मिलीग्रामची ताकद आहे. मेटफॉर्मिन कंट्रोल रिलीज टॅब्लेटची जास्तीत जास्त किंमत 500 मिलीग्राम प्रति टॅब्लेट 1.92 रुपये आहे.

नोव्हेंबरच्या अखेरीस कोरोनाची नवी लस येणार

हैदराबादस्थित फार्मास्युटिकल कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेड (BE) नोव्हेंबरच्या अखेरीस आपली कोविड 19 लस ‘कॉर्बेवॅक्स’ सादर करू शकते. कंपनी 10 कोटी डोससह ही लस लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हैदराबादस्थित कंपनी बीईच्या व्यवस्थापकीय संचालक महिमा दतला यांनी ही माहिती दिली. अमेरिकेच्या इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (DFC) सोबत निधी करार करण्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, उत्पादित डोस सध्या हिमाचल प्रदेशच्या कसौली येथे असलेल्या सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरीला (CDL) पाठवला जातो.

संबंधित बातम्या

सेन्सेक्स 145 अंकांनी वाढला, निफ्टीही हिरव्या चिन्हात बंद, सलग 4 दिवसांच्या घसरणीनंतर वाढ

HDFC बँकेची खास दिवाळी ऑफर, छोट्या EMI वर मोठी खरेदीची संधी

Big news! Government makes 12 drugs cheaper, NPPA takes big step

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!