AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेन्सेक्स 145 अंकांनी वाढला, निफ्टीही हिरव्या चिन्हात बंद, सलग 4 दिवसांच्या घसरणीनंतर वाढ

निफ्टी बँक व्यतिरिक्त सर्वच क्षेत्रातील शेअर्समध्ये आज घसरण झाली. निफ्टी बँक 868.75 अंकांच्या वाढीसह 41192.40 वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी आयटी 389.25 अंकांनी घसरून 35005.40 च्या पातळीवर पोहोचला. निफ्टी ऑटोने 1.80 टक्के किंवा 205.80 अंकांची घसरण नोंदवली आणि तो 11228.20 च्या पातळीवर बंद झाला.

सेन्सेक्स 145 अंकांनी वाढला, निफ्टीही हिरव्या चिन्हात बंद, सलग 4 दिवसांच्या घसरणीनंतर वाढ
शेअर मार्केट
| Edited By: | Updated on: Oct 25, 2021 | 5:21 PM
Share

मुंबई : भारतीय शेअर बाजारामध्ये आठवड्याच्या पहिल्या व्यापारी दिवशी आज जोरदार कल दिसून आला. बॉम्बे स्टॉक मार्केट (BSE) चा सेन्सेक्स आज म्हणजेच 25 ऑक्टोबर 2021 रोजी 145.43 अंकांनी किंवा 0.24 टक्क्यांच्या वाढीसह 60,967.05 वर बंद झाला. त्याच वेळी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टीदेखील आज 10.50 अंकांच्या किंवा 0.06 टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह 18,125.40 च्या पातळीवर बंद झाला. बँकिंग क्षेत्रातील समभागांमध्ये नोंद झालेल्या तेजीच्या आधारावर आज शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली. याशिवाय सर्वच क्षेत्रातील समभागांमध्ये घट झाली.

ऑटो-आयटीच्या घसरणीनंतरही बाजारात तेजी

निफ्टी बँक व्यतिरिक्त सर्वच क्षेत्रातील शेअर्समध्ये आज घसरण झाली. निफ्टी बँक 868.75 अंकांच्या वाढीसह 41192.40 वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी आयटी 389.25 अंकांनी घसरून 35005.40 च्या पातळीवर पोहोचला. निफ्टी ऑटोने 1.80 टक्के किंवा 205.80 अंकांची घसरण नोंदवली आणि तो 11228.20 च्या पातळीवर बंद झाला. बीएसई स्मॉलकॅपमध्येही आज घसरण दिसून आली. तो 1.76 टक्क्यांनी म्हणजेच 500.03 अंकांनी खाली 27,836.28 वर बंद झाला, तर बीएसई मिडकॅप 1.65 टक्क्यांनी कमी होऊन 25,144.73 अंकांवर बंद झाला.

या समभागांमध्ये सर्वाधिक उसळी

बीएसई सेन्सेक्समध्ये आज आयसीआयसीआय बँकेचा शेअर सर्वाधिक वाढला. कंपनीच्या समभागाने 10.85 टक्क्यांची प्रचंड उसळी नोंदवली. या व्यतिरिक्त अॅक्सिस बँकेचा हिस्सा 3.48 टक्के, ओएनजीसी 2.77 टक्के, जेएसडब्ल्यू स्टील 0.97 टक्के आणि डॉ. रेड्डीज लॅब्स 0.83 टक्के वाढला.

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण

बीएससी सेन्सेक्समध्ये आज बीपीसीएलचा शेअर सर्वाधिक तोट्यात होता. कंपनीच्या शेअरमध्ये 3.48 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. याशिवाय एसबीआय लाइफ इन्शुरन्स 3.21 टक्के, बजाज फिनसर्व्ह 3.06 टक्के, बजाज ऑटो 2.66 टक्के आणि एचसीएल टेक 2.40 टक्के घसरले. भारताव्यतिरिक्त आशियाई बाजारात हाँगकाँगचे हेंग सेंग आणि चीनचे शांघाय कंपोजिट हिरव्या चिन्हांत व्यापार करीत होते आणि टोकियोचे शेअर बाजार लाल रंगाच्या चिन्हावर बंद झाले. याशिवाय युरोपीय बाजारात आज संमिश्र कल दिसून आला.

संबंधित बातम्या

PM आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन काय?, या सरकारी योजनेचा तुम्हाला कसा फायदा?

मजबूत अर्थव्यवस्थेसाठी योग्य ऑडिट आवश्यक, आत्मविश्वास वाढला: शक्तिकांत दास

Sensex rises 145 points, Nifty closes green, rises after 4 consecutive days of decline

लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.