मोठी बातमी! मोदी सरकारनं 6.5 कोटी खातेदारांना PF व्याजाची रक्कम पाठवली, तुमच्या खात्यात पैसे आले का?

PF interest : 2020-21 या आर्थिक वर्षासाठी पीएफवर 8.5 टक्के व्याज हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला मोदी सरकारने यापूर्वीच हिरवा कंदील दाखवला होता. कामगार आणि रोजगार मंत्रालयानेही या निर्णयाला संमती दिली होती. आता EPFO ​​आपल्या ग्राहकांच्या खात्यात 8.5 टक्के व्याज जमा करत आहे. आता पीएफ बॅलन्स तपासण्याचे मार्ग जाणून घेऊया.

मोठी बातमी! मोदी सरकारनं 6.5 कोटी खातेदारांना PF व्याजाची रक्कम पाठवली, तुमच्या खात्यात पैसे आले का?
पीएफ
Follow us
| Updated on: Nov 10, 2021 | 8:49 PM

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने पीएफ खातेदारांना (PF Account holders) छठपूजेनिमित्त गिफ्ट (Chhath Pooja Gift) दिलंय. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) व्याजाचे पैसे ग्राहकांच्या पीएफ खात्यांमध्ये हस्तांतरित केलेत. आतापर्यंत तुम्हाला व्याज हस्तांतरणाचा (PF Interest) एसएमएसही आलेला असेल. तुम्हाला मेसेज आला नसला तरी तुम्हाला पीएफची रक्कम तपासता येणार आहे.

पीएफची रक्कम नेमकी कशी तपासायची?

2020-21 या आर्थिक वर्षासाठी पीएफवर 8.5 टक्के व्याज हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला मोदी सरकारने यापूर्वीच हिरवा कंदील दाखवला होता. कामगार आणि रोजगार मंत्रालयानेही या निर्णयाला संमती दिली होती. आता EPFO ​​आपल्या ग्राहकांच्या खात्यात 8.5 टक्के व्याज जमा करत आहे. आता पीएफ बॅलन्स (PF Balance) तपासण्याचे मार्ग जाणून घेऊया.

मिस्ड कॉलद्वारे बॅलन्स कसा तपासायचा?

EPFO सदस्य नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 वर मिस्ड कॉल देऊ शकतात. यानंतर ईपीएफओकडून एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या पीएफ खात्याची माहिती मिळेल. यासाठी बँक खाते, पॅन आणि आधार यांना UAN शी लिंक करणे आवश्यक आहे.

एसएमएसद्वारे पीएफ बॅलन्स कसा तपासायचा?

जर तुमचा UAN EPFO ​​मध्ये नोंदणीकृत असेल, तर तुमचे नवीनतम योगदान आणि PF शिल्लक माहिती मेसेजमधून मिळू शकते. यासाठी तुम्हाला EPFOHO UAN ENG 7738299899 वर पाठवावे लागेल. शेवटची तीन अक्षरे भाषेसाठी आहेत. तुम्हाला हिंदीत माहिती हवी असेल तर तुम्ही EPFOHO UAN HIN लिहून पाठवू शकता. ही सेवा इंग्रजी, पंजाबी, मराठी, हिंदी, कन्नड, तेलगू, तमिळ, मल्याळम आणि बंगालीमध्ये उपलब्ध आहे. हा एसएमएस UAN च्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून पाठवावा लागतो.

ईपीएफओद्वारे अशा प्रकारे बॅलन्स तपासा

>> यासाठी तुम्हाला ईपीएफओच्या वेबसाईटवर जावे लागेल. >> येथे Employee Centric Services वर क्लिक करा. >> आता View Passbook वर क्लिक करा. >> पासबुक पाहण्यासाठी तुम्हाला UAN ने लॉगिन करावे लागेल.

उमंग अॅपद्वारे बॅलन्स कसा तपासायचा?

>> तुमचे उमंग अॅप उघडा आणि EPFO ​​वर क्लिक करा. >> तुम्हाला दुसऱ्या पेजवर Employee Centric Service वर क्लिक करावे लागेल. >> येथे View Passbook वर क्लिक करा. >> तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड (OTP) नंबर टाका. >> यानंतर तुम्ही तुमचा पीएफ शिल्लक तपासू शकता.

संबंधित बातम्या

Gold Silver Price Today: सोनं खरेदी महागलं, 10 ग्रॅमची किंमत किती?

रेल्वे तिकीट रद्द करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, किती शुल्क कापले जाणार?

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.