स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी, प्रतितोळा दर 47 हजाराच्या खाली, वाचा नवे भाव…

| Updated on: Jun 17, 2021 | 8:28 PM

सध्या स्वस्त सोनं खरेदी करण्याची चांगली संधी आहे. मंद जागतिक बाजाराच्या स्थितीमुळे भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold Silver Price today) मोठी पडझड झालीय.

स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी, प्रतितोळा दर 47 हजाराच्या खाली, वाचा नवे भाव...
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

मुंबई : सध्या स्वस्त सोनं खरेदी करण्याची चांगली संधी आहे. मंद जागतिक बाजाराच्या स्थितीमुळे भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold Silver Price today) मोठी पडझड झालीय. दिल्लीच्या सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याच्या दरात (Gold Price) मोठी घट होऊन 861 रुपयांनी सोनं स्वस्त झालं. चांदीच्या किमती (Silver Price) देखील 1,709 रुपये प्रति किलोग्रॅम कमी झाल्या. HDFC सिक्युरिटीजनुसार जागतिक व्यापर मंद झाल्यानं सोन्याच्या दरात ही घट होत आहे. फेडरल रिजर्वने व्याज दर वाढवण्याचे संकेत दिल्यानंतर सोन्याच्या दरात पडझड पाहायला मिळाली (Big opportunity to buy Gold Silver in low price today 17 June 2021).

सोन्याचे नवे दर (Gold Price on 17 June 2021):

दिल्ली सराफ बाजारात सोन्याचे दर 861 रुपयांनी कमी होऊन 46,863 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. बुधवारी (16 जून) सोन्याचे दर 47,724 रुपये प्रति तोळावर बाजार बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1,810 डॉलर प्रति औंस दराने विकलं जात आहे.

चांदीची नवी किंमत (Silver Price on 17 June 2021):

दुसरीकडे दिल्लीतील सराफ बाजारात चांदीच्या किमतीतही पडझड झालेली पाहायला मिळाली. एक किलोग्रॅम चांदीच्या किमतीत 1,709 रुपये घट होऊन 68,798 रुपये दर झाला. बुधवारी (16 जून) हा दर 70,507 रुपये प्रति किलोग्रॅम होता. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत 26.89 डॉलर प्रति औंस आहे.

सोन्याची किंमत कमी होण्यामागे कारण काय?

यूएस फेडरल रिझर्वने दिलेल्या संकेतानुसार लवकरच अपेक्षेपेक्षा जास्त व्याज दर वाढवू शकतात. यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोन्याच्या किंमतीत अडीच टक्क्यांहून अधिक टक्के घट झाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यात डॉलरची किंमत ही उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. तर गेल्या दहा वर्षात यूएस ट्रेझरीच्या उत्पादनात वाढ झाली.

हेही वाचा :

Gold Price : सोन्याचा किंमतीत मोठी घसरण, तोळ्याचे नवे दर किती?

सोनं खरं की खोटं कसं ओळखाल? आता प्रत्येक दागिण्यावर ‘ही’ 4 चिन्ह पाहा, उत्तर मिळेल

Gold Hallmarking | सराफा व्यापारांना मोठा दिलासा, हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांच्या दंडाबद्दल मोठा निर्णय

व्हिडीओ पाहा :

Big opportunity to buy Gold Silver in low price today 17 June 2021