AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिल ‘गेट्स’ यांना 20 वर्षां पूर्वीच्या लफड्याचा झटका; कंपनीही गेली, पत्नीही गेली, बोर्डाने दिला ‘हा’ निर्णय!

एका महिला कर्मचार्‍याने बोर्डाला पत्र लिहित बिल गेट्सशी आपले संबंध असल्याचे सांगितल्यानंतर कंपनीकडून चौकशी सुरू झाली. हे प्रकरण 2019 चे आहे.

बिल 'गेट्स' यांना 20 वर्षां पूर्वीच्या लफड्याचा झटका; कंपनीही गेली, पत्नीही गेली, बोर्डाने दिला 'हा' निर्णय!
बिल गेट्स यांच्या 20 वर्षे जुन्या अफेअरबाबत बोर्डाने घेतला हा निर्णय
| Updated on: May 17, 2021 | 7:44 PM
Share

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्सच्या अडचणीत वाढ होत आहे. बिल गेट्स यांनी आपला 27 वर्षांचा संसार मोडल्याबाबत नुकतेच चर्चेत आले होते. मात्र आता महिला कर्मचार्‍याशी असलेल्या बिल गेट्स यांच्या संबंधाबाबत मायक्रोसॉफ्ट बोर्ड चौकशी करत आहे. वॉल स्ट्रीट जनरलच्या वृत्तानुसार, कंपनी बोर्डाने निर्णय घेतला आहे की या प्रकरणानंतर बिल गेट्स यांनी बोर्डवर राहणे योग्य नाही. बिल गेट्स यांना बोर्ड सोडण्यापूर्वी ही चौकशी पूर्ण करावी लागेल, असा मंडळाने निर्णय घेतला आहे. वास्तविक, बिल गेट्स यांचे आपल्या इंजिनिअर कर्मचारीसोबत 20 वर्षे प्रेम संबंध होते.

चौकशी होण्याआधीच बिल गेट्सनी दिला राजीनामा

या प्रकरणानंतर बिल गेट्सच्या वैयक्तिक आयुष्यावर अनेक प्रकारचे आरोप लावले जात आहेत. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार बिल गेट्स यांनी विवाहीत असतानाही काही महिला कर्मचार्‍यांना डेटवर येण्याबाबत विचारणा केली. त्याचबरोबर एका महिला कर्मचार्‍याशी गेट्सच्या संबंध असल्याचेही स्पष्ट झाले आहे. वास्तविक, संबंध उघडकीस आल्यानंतर मंडळाची चौकशी होण्याआधीच बिल गेट्सने मायक्रोसॉफ्टचा राजीनामा दिला.

वैयक्तिक संबंध भारी पडले

वास्तविक या प्रकरणाचा बिल गेट्सच्या प्रतिमेवर परिणाम झाला आहे. तसेच कंपनीच्या गुडविलवर याचा अधिक परिणाम होऊ नये म्हणून कंपनी बोर्डाने निर्णय घेतला आहे की बिल गेट्स जाण्यापूर्वीच कंपनीची चौकशी पूर्ण करावी लागेल. एका महिला कर्मचार्‍याने बोर्डाला पत्र लिहित बिल गेट्सशी आपले संबंध असल्याचे सांगितल्यानंतर कंपनीकडून चौकशी सुरू झाली. हे प्रकरण 2019 चे आहे. ही चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच बिल गेट्सने आपला राजीनामा मायक्रोसॉफ्टकडे सादर केला होता.

नुकतीच केली घटस्फोटाची घोषणा

बिल गेट्सने नुकतेच त्यांचे 27 वर्षांचे लग्न मोडल्याची घोषणा केली होती. बिल गेट्स यांनी ट्विट करून ही बाब सार्वजनिक केली होती. वास्तविक बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी ठरविले की ते गेट्स फाऊंडेशनबरोबर काम करत राहतील, परंतु वैयक्तिक आयुष्यात दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी Steroidsचा मारा, ‘म्युकरमायकोसिस’चा धोका वाढला

गुंतवणूकदारांची आज 3 लाख कोटींनी संपत्ती वाढली, जाणून घ्या तेजीचं कारण

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.