AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BSNL-MTNL: विलीनीकरणाला कर्जाचा डोंगर आडवा, देशभरात लाखभर 4-G टॉवर!

सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची भारत संचार निगम लिमिटेड(बीएसएनएल) (BSNL) आणि महानगर संचार निगम लिमिटेड (एमटीएनएल) (MTNL) यांचे संभाव्य विलीनीकरण तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.

BSNL-MTNL:  विलीनीकरणाला कर्जाचा डोंगर आडवा, देशभरात लाखभर 4-G टॉवर!
विलीनीकरणाला कर्जाचा डोंगर आडवा, देशभरात लाखभर 4-G टॉवरImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Apr 06, 2022 | 10:51 PM
Share

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील तोट्यातील कंपन्यांना उर्जितावस्था देण्यासाठी केंद्र सरकारनंे धोरणात्मक कार्यक्रम हाती घेतला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची भारत संचार निगम लिमिटेड(बीएसएनएल) (BSNL) आणि महानगर संचार निगम लिमिटेड (एमटीएनएल) (MTNL) यांचे संभाव्य विलीनीकरण तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. आर्थिक कारणांअभावी दोन्ही दूरसंचार कंपन्यांचे विलीनीकरण (MERGER PROCESS) होणार नसल्याची माहिती केंद्राच्या वतीने संसदेत देण्यात आली आहे. दरम्यान, दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणाच्या अन्य पर्यायावर पडद्यामागून वेगवान घडामोडी घडत आहे. ग्रामीण क्षेत्रात सर्वाधिक विस्तार असलेल्या बीएसएनएला बळकटी देण्यासाठी 4-G आधारीत नेटवर्क विस्ताराला (NETWORK TOWER) गती देण्यासाठी बीएसएनएल देशभरात 1.12 लाख टॉवर उभारणार असल्याची माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

एमटीएनएलवर कर्जाचा डोंगर

केंद्र सरकारने 23 ऑक्टोबर 2019 ला बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या रिकव्हरीला ग्रीन सिग्नल दिला आहे. ज्यामध्ये दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण समाविष्ट आहे. मात्र, अधिक कर्जासहित अन्य आर्थिक बाबींमुळे विलीनीकरण सध्या प्रस्तावित नसल्याचा सरकारी अधिकाऱ्यांचा अंतर्गत अहवालात म्हटलं आहे. एमएटीएनलवर कर्जाचा भार अधिक आहे. त्यामुळे पहिल्यांदा कर्जाचा भार हलका करुन त्यानंतर विलिनीकरण शक्य असल्याचं सरकारी सूत्रांचं म्हणणं आहे.

देशात लाखभर टॉवर

लोकसभेत अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री अश्वीनी वैष्णव यांनी 4-G आधारित नेटवर्कचं जाळ विस्तारण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे देशभरात एक लाखाहून अधिक टॉवर उभारणीचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. सध्या तत्काळ स्वरुपात सहा हजार आणि त्यानंतर सहा हजार टॉवरच्या ऑर्डर प्रक्रियेला गती देण्यात आली आहे.

..रेल्वेत ‘फुल्ल’ इंटरनेट!

रेल्वेत इंटरनेट कनेक्शन उपलब्धतेच्या मुद्द्यावर देखील केंद्रीय मंत्र्यांनी भाष्य केलं आहे. 4-G नेटवर्क क्षमतेमुळे ताशी 100 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या रेल्वेत इंटरनेटचे पुरेशे कनेक्शन उपलब्ध होत नाही. त्यासाठी 5-G तंत्रज्ञानाची आवश्यकता असल्याचे केंद्रांनी मंत्र्यांनी म्हटलं आहे.

इतर बातम्या

AUTO TRACKER: ‘ह्युंदाई’ला सोशल झळ, वाहन विक्रीचा टक्का घसरला; ‘ही’ कंपनी टॉप

FORBES LIST: सावित्री जिंदाल देशातील सर्वात श्रीमंत महिला! जाणून घ्या – संपत्ती ते व्यवसाय

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.