AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत दिपके यांचा मोठा इशारा, मंगळवारपर्यंत मागणी पूर्ण झाली नाही तर पुन्हा उपोषण..

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी सरकारला मोठा इशारा दिला. पुन्हा एकदा अभिजीत दिपके आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. मंगळवारपर्यंत मागणी पुर्ण झाली नाही तर उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अभिजीत दिपके यांचा मोठा इशारा, मंगळवारपर्यंत मागणी पूर्ण झाली नाही तर पुन्हा उपोषण..
Abhijeet Deepke
| Updated on: Aug 16, 2026 | 10:05 AM
Share

अभिजीत दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीने मोठे आंदोलन केले. नीट पेपरफुटीविरोधात त्यांनी हे आंदोलन केले. थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. सुरूवातीला सरकारने त्यांचा राजीनामा घेण्यास टाळाटाळ केली. पण सरकारवरील दबाव प्रचंड वाढवा. अभिजीत दिपके यांनी सध्या तरी राजकारणात जाण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट केले. पण ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारविरोधात लढणार आहेत. आता अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी मोठा इशारा दिला. काल त्यांनी 15 ऑगस्ट हिंगोलीतील शाळेत विद्यार्थ्यांसोबत साजरा केला. आता अभिजीत दिपकेंनी पोस्टमध्ये म्हटले की, हिंगोली जिल्ह्यातील लिंबाळा गावातील शाळेच्या मुख्याध्यापकांकडून मद्यपान केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

याबाबत ग्रामस्थांनी वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा दावा करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी अभिजीत दिपके यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना फोन करून जाब विचारला. मुख्याध्यापकांची मंगळवारपर्यंत बदली अथवा पदावरून हटवणूक न झाल्यास ग्रामस्थांसोबत स्वतः उपोषणाला बसणार, असा इशारा अभिजीत दीपके यांनी दिला आहे.

यासंदर्भातील व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मुख्याध्यापकांच्या कथित मद्यपानाच्या सवयीमुळे शाळेतील शैक्षणिक वातावरणावर परिणाम होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासोबतच शाळेतील शिक्षकांची कमतरताही गंभीर समस्या बनली आहे.

पाच वर्गांसाठी केवळ दोन शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मुख्याध्यापकांवरील आरोप आणि शिक्षकांची कमतरता या दोन्ही प्रश्नांची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन योग्य ती चौकशी व कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. जर मंगळवारपर्यंत संबंधित मुख्यध्यापकांवर कारवाई झाली नाही तर अभिजीत दिपके उपोषणाला बसणार आहेत. त्यांनी याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. जर मुख्याध्यापकांवर कारवाई झाली नाही तर अभिजीत दिपके उपोषण सुरू करणार आहेत.

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...