AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Awarapan 2: ‘आवारापन 2’ पहावा की नाही? इमरान हाश्मीच्या सिनेमात नेमकं काय खास, काय खटकतं?

Awarapan 2 Review: अभिनेता इमरान हाश्मी तब्बल 19 वर्षांनंतर शिवम पंडितच्या भूमिकेत परतला आहे. 14 ऑगस्ट रोजी 'आवारापन 2' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून तो थिएटरमध्ये पहावा की नाही, हे ठरवण्यापूर्वी हा रिव्ह्यू वाचा..

Awarapan 2: 'आवारापन 2' पहावा की नाही? इमरान हाश्मीच्या सिनेमात नेमकं काय खास, काय खटकतं?
आवारापन 2 रिव्ह्यू, इमरान हाश्मीImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 16, 2026 | 10:00 AM
Share

Awarapan 2 Review: जवळपास 19 वर्षांनंतर ‘आवारापन’मधील शिवम पंडित पुन्हा मोठ्या पडद्यावर परतला आहे. इमरान हाश्मी आणि दिशा पटानी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘आवारापन 2’ हा चित्रपट 14 ऑगस्ट 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. नितीन कक्कर दिग्दर्शित या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. कारण पहिल्या भागाने प्रदर्शनाच्या वेळी बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली नसली तरी काळानुसार त्याला ‘कल्ट फॉलोइंग’ मिळाली होती. त्यातील गाणी आणि इमरानची शिवम पंडित ही व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता हा सीक्वेल थिएटरमध्ये पहावा की नाही, याबद्दल तुमच्या मनात संभ्रम असेल तर आधी हा रिव्ह्यू वाचा..

कथा काय?

पहिल्या भागापेक्षा यावेळी सीक्वेलमध्ये शिवम पंडितची कथा वेगळ्या पार्श्वभूमीवर पुढे जाते. या चित्रपटाचा केंद्रबिंदू मानवी तस्करी हा विषय आहे. शिवम एका मोहिमेचा भाग बनतो आणि मानवी तस्करीच्या धोकादायक नेटवर्कमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी त्याला गुन्हेगारी विश्वातील लोकांमध्ये आपली ओळख निर्माण करावी लागते. त्यामुळे ‘आवारापन 2’मध्ये भावनिक संघर्षासोबत अॅक्शनचाही मोठा भाग पहायला मिळतो.

इमरान हाश्मीची जादू

या सीक्वेलची सर्वांत मोठी ताकद म्हणजे इमरान हाश्मी. शिवमच्या व्यक्तिरेखेत त्याने पुन्हा एकदा वेदना, राग आणि भावनिक अस्वस्थता प्रभावीपणे मांडली आहे. विशेष म्हणजे 2007 मधील भूमिकेचा भाव कायम ठेवत इमरानने शिवमला नव्या परिस्थितीत उभं केलं आहे.

‘आवारापन 2’मध्ये अत्यंत गंभीर विषय हाताळण्यात आला असला तरी याचा स्क्रीनप्ले अपेक्षेइतका प्रभावी ठरत नाही. काही प्रसंगांमध्ये कथेचा अंदाज सहज येतो आणि अनेक गोष्टींमुळे मुख्य कथेला अपेक्षित धार मिळत नाही. इमरान हाश्मीची भूमिका जबरदस्त असली तरी शबाना आझमी आणि दिशा पटानी यांसारख्या कलाकारांना अपेक्षेइतकी भूमिकेची खोली मिळत नाही.

संगीत

‘आवारापन’ म्हटलं की त्यातील संगीत, गाणी हा विषय टाळता येणार नाही. जुन्या गाण्यांच्या आठवणी, ‘तेरा मेरा रिश्ता’शी जोडलेला भावनिक संदर्भ या सीक्वेलमध्येही महत्त्वाचा ठरतो. एकंदरीत ‘आवारापन 2’ हा चित्रपट इमरान हाश्मीच्या चाहत्यांसाठी आणि पहिल्या भागाशी भावनिक नातं असलेल्या प्रेक्षकांसाठी पाहण्यासारखा आहे. मात्र पहिल्या भागासारखी भावनिक खोली आणि दमदार कथेच्या बाबतीत हा सीक्वेल काही अंशी निराशाजनक ठरतो.

Follow Us
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?