ना पोस्ट ऑफिस, ना बँक! टाटाच्या ‘या’ कंपनीद्वारे बंपर कमाई, एका वर्षात 1 लाखाचे 5 लाख!

टाटा ग्रुपच्या दोन कंपन्यांच्या शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. या कंपनीच्या शेअरमध्ये पैसा गुंतवलेल्या लोकांनी एवढा पैसा कमावला आहे की, एफडीसारख्या अन्य कुठल्याही योजनेतून मिळवण्यासाठी त्यांना अनेक वर्षे लागली असती.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:30 PM, 23 Feb 2021
ना पोस्ट ऑफिस, ना बँक! टाटाच्या 'या' कंपनीद्वारे बंपर कमाई, एका वर्षात 1 लाखाचे 5 लाख!
Maharashtra State National Workers Union

मुंबई : सर्वसाधारणपणे लोक आपला पैसा पोस्ट ऑफिसमधील बचत योजना किंवा बँकेत फिक्स डिपॉझिटमध्ये टाकतात. या योजनेतून ग्राहकांना मिळणारा परतावा हा निश्चित स्वरुपाचा असतो. पोस्ट ऑफिस किंवा बँक नंतर शेअर बाजार हे गुंतवणुकीचं असं एक केंद्र आहे जिथे मिळणाऱ्या परताव्याला कुठलीही निश्चित स्वरुप नसतं. इथं अन्य बचत योजनांपेक्षा अधिक पटीने परतावा मिळण्याची शक्यता असते. टाटा ग्रुपच्या दोन कंपन्यांच्या शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. या कंपनीच्या शेअरमध्ये पैसा गुंतवलेल्या लोकांनी एवढा पैसा कमावला आहे की, एफडीसारख्या अन्य कुठल्याही योजनेतून मिळवण्यासाठी त्यांना अनेक वर्षे लागली असती.(Bumper returns to investors from shares of Tata Communications and Tata Motors)

स्टॉक मार्केट हे गुंतवणुकीचं असं एक साधन आहे, जिथं तुम्ही तुमचा पैसा काही वर्षात कितीतरी पटीने परत मिळवू शकता. बाजारात काही शेअर असे आहेत जे गुंतवणुकदारांना बंपर रिटर्न देऊ शकतात, असं तज्ज्ञांचं मत आहे. दरम्यान शेअर बाजारातील गुंतवणूक ही अनेक अडचणींनी भरलेली आहे. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना तुम्हाला एखात्या तज्ज्ञाची किंवा तुमच्या अर्थ सल्लागाराची मदत घेणं उपयुक्त ठरेल.

160 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न!

टाटा ग्रुपची कंपनी टाटा कम्यूनिकेशन (Tata Communications) आणि टाटा मोटर्स (Tata Motors)ने गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न दिला आहे. टाटा कम्युनिकेशनच्या शेअर्सचा भाव सध्या 1 हजार 45 रुपये आहेत. याच कंपनीचा भाव गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात 388.60 रुपये होता. या हिशोबाने कंपनीने 168 टक्के रिटर्न दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल. तर त्याची रक्कम वाढून एका वर्षात ती 2.68 लाख रुपये झाली आहे.

टाटा मोटर्सने गुंतवणूकदारांना केलं मालामाल

गेल्या एक वर्षात टाटा मोटर्सने गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. गेल्या एक वर्षात टाटा मोटर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जेवढी कमाई करुन दिली आहे, तेवढी एखाद्या एफडीतून मिळवण्यासाठी त्यांना अनेक वर्षे वाट पाहावी लागली असती. मार्च 2020 मध्ये टाटा मोटर्सचा शेअर 63.60 रुपयांपर्यंत खाली आला होता. आता 23 फेब्रुवारीला टाटा मोटर्सच्या शेअरचा भाव 323 रुपये आहे. म्हणजे गुंतवणूकदारांना तब्बल 400 टक्के रिटर्न मिळाला आहे. जर गेल्या वर्षी एखाद्याने टाटा मोटर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर आज त्याला 5 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळाली आहे.

संबंधित बातम्या : 

1000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार 50 लाख रुपये; जबरदस्त योजना

Post Office ची धमाकेदार योजना, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर महिन्याला मिळेल उत्तम परतावा

Bumper returns to investors from shares of Tata Communications and Tata Motors