AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

150 रुपयांमध्ये घ्या LIC पॉलिसी, मिळतील 19 लाख; हवे तेव्हा काढू शकता पैसे

सध्याच्या काळात, आर्थिक गणित आखणं अत्यंत कठीण झालं आहे. मुलांच्या शिक्षणापासून ते त्यांच्या लग्नापर्यंत पालकांना पैशांची काळजी असतेच. अशात भारतीय जीवन विमा महामंडळानेही ही बाब लक्षात घेत अशीच एक खास योजना आणली आहे.

150 रुपयांमध्ये घ्या LIC पॉलिसी, मिळतील 19 लाख; हवे तेव्हा काढू शकता पैसे
| Edited By: | Updated on: Feb 07, 2021 | 10:21 AM
Share

मुंबई : देशातली सगळ्यात मोठी जीवन विमा कंपनी भारतीय जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) प्रत्येक वेळी ग्राहकांसाठी खास योजना आणत असते. या कंपनीत ग्राहकांना गुंतवणुकीवर अनेक फायदे मिळतात. सध्याच्या काळात, आर्थिक गणित आखणं अत्यंत कठीण झालं आहे. मुलांच्या शिक्षणापासून ते त्यांच्या लग्नापर्यंत पालकांना पैशांची काळजी असतेच. अशात भारतीय जीवन विमा महामंडळानेही ही बाब लक्षात घेत अशीच एक खास योजना आणली आहे. (business news lic new children money back plan only invest 150 rs and get 19 lakhs)

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही योजना मुलांच्या वाढत्या गरजा लक्षात घेत तयार करण्यात आली आहे. या योजनेचं नाव ‘न्‍यू चि‍ल्‍ड्रन्‍स मनी बॅक प्‍लॅन’ (LIC New Children’s Money Back Plan) आहे. यामध्ये मुलांच्या शिक्षणापासून ते इतर खर्चासाठी उत्तम सुविधा दिल्या आहेतय जाणून घेऊयात या योजनेविषयी खास

– या पॉलिसीसाठी कमीत कमी वय 0 वर्ष आहे.

– विमा उघडण्यासाठी जास्तीत जास्त 12 वर्ष वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

– याची किमान विमा रक्कम 10,000 रुपये आहे.

– विम्याच्या रक्कमेवर कोणतीही मर्यादा नाही.

– यामध्ये प्रीमियम वेव्हर बेनिफिट रायडर-पर्याय देखील उपलब्ध आहे.

– मॅच्युरिटीचा कालावधी – एलआयसीच्या नवीन मुलांच्या मनी बॅक प्लॅनची ​​एकूण मुदत 25 वर्षे आहे.

– मनी बॅक हप्ता – या योजनेंतर्गत मुलगा किंवा मुलगी 18 वर्ष, 20 वर्षे आणि 22 वर्षांचे झाल्यानंतर विमा उतरलेल्या मूलभूत रकमेपैकी 20-20% एलआयसी भरते. उर्वरित 40 टक्के रक्कम 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पॉलिसीधारकास दिली जाते. इतकंच नाहीतर, सर्व थकबाकी बोनस दिला जातो.

– मॅच्युरिटी बेनिफिट – पॉलिसी मॅच्युरिटीच्या वेळी पॉलिसीधारकाला उर्वरित रकमेपैकी 40% बोनस मिळेल.

– डेथ बेनिफिट – पॉलिसीच्या मुदतीमध्ये जर पॉलिसीधारकाच्या मृत्यू झाला तर सम अॅश्युअर्डव्यतिरिक्त, बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस त्याच्या कुटुंबाला दिला जातो.

(टीप- कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अर्थतज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या) (business news lic new children money back plan only invest 150 rs and get 19 lakhs)

संबंधित बातम्या – 

फक्त 5 लाखांमध्ये सुरू करा ‘हा’ बिझनेस, दर महिना कमवाल 70,000 रुपये

Petrol Diesel Price: कच्च्या तेलाची किंमत वाढली; आपल्या शहरात पेट्रोल-डिझेलचे भाव काय?

business idea शोधताय तर एकदा हा विचार कराच, कमी जागेत लाखोंनी कमावाल!

SBI मध्ये ‘या’ लोकांनी फक्त 5 दिवसात केली 1.24 लाख रुपयांची कमाई, वाचा कशी?

(business news lic new children money back plan only invest 150 rs and get 19 lakhs)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.