SBI मध्ये ‘या’ लोकांनी फक्त 5 दिवसात केली 1.24 लाख रुपयांची कमाई, वाचा कशी?

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर व्यापार व्यापार आठवड्यांच्या शेवटच्या उच्चांकी पातळीवर गेला.

SBI मध्ये 'या' लोकांनी फक्त 5 दिवसात केली 1.24 लाख रुपयांची कमाई, वाचा कशी?

मुंबई : देशातली सगळ्यात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने बँकेचा तिमाही निकाल नुकताच जाहीर केला. 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या बँकेच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर व्यापार व्यापार आठवड्यांच्या शेवटच्या उच्चांकी पातळीवर गेला. यामुळे बँकेच्या गुंतवणूकदारांचीही मोठी कमाई झाली आहे. म्हणजे अगदी सरळ सांगायचं झालं तर गुंतवणूकदारांना 1 ते 5 फेब्रुवारी दरम्यान एका शेअरवर तब्बल 124 रुपयांचा नफा झाला. (make money shares hike investors earn huge money from sbi shares)

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 1 फेब्रुवारीला एसबीआयचा शेअर भाव 284 रुपये होता, जो 5 फेब्रुवारीला थेट 408 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. म्हणजेच गुंतवणूकदारांना थेट 124 रुपयांचा नफा झाला आहे. यामध्येही ज्या गुंतवणूकदारांनी या काळात एसबीआयचे 1000 शेअर्स खरेदी केले त्यांना थेट 1.24 लाख रुपयांचा नफा झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.

अशा वाढत्या किंमती

1 फेब्रुवारीपासून एसबीआयचे शेअर वाढण्यास सुरुवात झाली जी 5 फेब्रुवारीपर्यंत वाढतच गेली. 1 फेब्रुवारीला, एका शेअर्सची किंमत 284 रुपये होती, जी 2 फेब्रुवारीला 334 रुपयांवर गेली, नंतर 3 फेब्रुवारीला बाजारात चढ उतार असूनही 336 रुपयांवर गेली. यानंतर मोठ्या विक्रमासह 4 आणि 5 फेब्रुवारीला आकडे वाढले. 5 फेब्रुवारीला शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकी म्हणजेच 408 रुपयांवर पोहोचला.

5 दिवसांत 42 टक्क्यांनी घेतली झेप

एसबीआयन दिलेल्या माहितीनुसार, शेअर्समध्ये तब्बल 41.78 टक्क्यांनी तेजी पाहायला मिळत आहे. यासोबतच एसबीआयच्या शेअर्समध्ये एका महिन्यात 42 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर एका वर्षाच्या आत या सरकारी बँकेच्या शेअर्समुळे समभागांनी गुंतवणूकदारांना 45 टक्के नफा मिळवला आहे. शेअरच्या किंमती वाढल्यामुळे बँकेची बाजारपेठ 3,49800.15 कोटी रुपयांवर गेली. (make money shares hike investors earn huge money from sbi shares)

संबंधित बातम्या – 

Ratan Tata : 4 वेळा प्रेमात पडलो पण मी मागे हटलो, कारण…; रतन टाटांनी सांगितलं लव्ह लाईफ

Money Mistakes: छोटी कर्ज अन् मोठा त्रास! झटपट कर्जापासून ‘असा’ करा बचाव

Special Story : सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधताय तर ही योजना खास आहे, कमी पैशात मिळेल बक्कळ परतावा

SBI च्या ATM वर 8 सुविधा मिळतात मोफत; आता दिवसभरात ‘एवढे’ काढता येणार पैसे

(make money shares hike investors earn huge money from sbi shares)

Published On - 11:41 am, Sat, 6 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI