AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Credit Card: बँकेत खाते नसेल तर क्रेडिट कार्ड मिळू शकते का? वाचा नियम…

सध्याच्या काळात बरेच लोक क्रेडिट कार्डने पेमेंट करणे पसंत करतात. मात्र तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडला असेल की, बँकेत खाते नसेल तर क्रेडिट कार्ड मिळू शकते का? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Credit Card: बँकेत खाते नसेल तर क्रेडिट कार्ड मिळू शकते का? वाचा नियम...
Credit Card
| Updated on: Sep 22, 2025 | 3:17 PM
Share

तुमच्यापैकी अनेकांकडे क्रेडिट कार्ड असेल. सध्याच्या काळात बरेच लोक क्रेडिट कार्डने पेमेंट करणे पसंत करतात. मात्र तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडला असेल की, बँकेत खाते नसेल तर क्रेडिट कार्ड मिळू शकते का? कारण बऱ्याचदा बँका तुमच्या खात्यातील व्यवहारावर नजर ठेवतात आणि त्यानंतर क्रेडिट कार्ड देतात. मात्र बँकेत खाते नसले तरीही क्रेडिट कार्ड मिळवता येते. यासाठी नेमके काय नियम आहेत? कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

क्रेडिट कार्डसाठी बँक खाते असणे आवश्यक नाही

एखाद्या व्यक्तीचे बँकेत खाते नसेल तरीही त्याला क्रेडिट कार्ड मिळू शकते. क्रेडिट कार्ड किंवा पर्सनल लोन घेण्यापूर्वी त्याची परतफेड प्रक्रिया माहिती असणे गरजेचे आहे. अनेक स्वतंत्र वित्तीय संस्था, नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) आणि फिनटेक प्लॅटफॉर्म तुम्हाला क्रेडिट कार्ड देऊ शकतात. यासाठी बँकेत बचत खाते असणे आवश्यक नाही. हे क्रेडिट कार्ड ग्राहक सामान्य क्रेडिट कार्डप्रमाणे खरेदी, बिल पेमेंट आणि इतर कामांसाठी वापरले जाते. महत्त्वाची बाब म्हणजे या क्रेडिट कार्डमुळे तुमचा क्रेडिट स्कोअरही सुधारतो.

क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी पात्रता काय आहे?

  • अर्जदारांचे वय किमान 21 वर्षे असले पाहिजे.
  • अर्जदाराकडे नोकरी किंवा व्यवसायातून स्थिर उत्पन्न स्रोत असणे आवश्यक आहे.
  • 750 किंवा त्याहून अधिक क्रेडिट स्कोअर आवश्यक

आवश्यक कागदपत्रे

  • पॅन कार्ड आणि आधार कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • पत्त्याच्या पुराव्यासाठी वीज किंवा पाणीबिल
  • पगारदार व्यक्तींसाठी सॅलरी स्लिप

बँक खाते नसल्यास क्रेडिट कार्डचे काय फायदे आहेत?

  • मिनिमम बॅलन्सचं टेन्शन नाही – सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला बँक खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याची सक्ती नसते. कारण बऱ्याच बँका खात्यात किमान शिल्लक न ठेवल्यास दंड आकारतात, मात्र खाते नसेल तर बॅलन्सचे टेन्शन नसते.
  • सोप्या पद्धतीने बिल भरता येते – या कार्ड्सचे बिल भरणे देखील खूप सोपे आहे. तुम्ही तुमचे बिल UPI, पेमेंट अॅप्स किंवा स्टोअरमध्ये थेट ओव्हर-द-काउंटरद्वारे भरू शकता. तसेच अशी क्रेडिट कार्ड मोठ्या प्रमाणात रिवार्ड पॉइंट्सदेखील देतात.
Follow Us
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील निवसस्थानी... राजकारणातील हालचालींना वेग
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी..
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी दिली; आता अभिनेत्री...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्... 'ऑपरेशन टायगर'बाबत मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...; खासदार फुटीनंतर दादा भुसेंचं मोठं विधान
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा पलटवार; म्हणाले, त्यासाठी ठाकरेंना...
बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
Rohit Pawar On Operation Tiger | बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार, महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Sanjay Raut Full Press | 6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार – आता महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकड
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकडून अधिकृत पत्र जारी, काय घडलं?
खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक!
Yawatmal | खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक! संजय देशमुखांचा पुतळा जाळत संताप!