पगार मुदतीआधीच जमा होणार, महाराष्ट्र आणि केरळमधील सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर!

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारने काहीशी खुशखबर दिली आहे. केंद्र सरकार ऑगस्ट (August salary) आणि सप्टेंबरचा (September salary in advance) पगार अॅडव्हान्समध्ये होणार आहे.

पगार मुदतीआधीच जमा होणार, महाराष्ट्र आणि केरळमधील सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर!
Employees Salary
Follow us
| Updated on: Aug 12, 2021 | 1:42 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारने काहीशी खुशखबर दिली आहे. केंद्र सरकार ऑगस्ट (August salary) आणि सप्टेंबरचा (September salary in advance) पगार अॅडव्हान्समध्ये होणार आहे. महाराष्ट्र (Maharashtra) आणि केरळमधील (Kerala) केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन महिन्यात या दोन्ही राज्यांमध्ये अनेक सण-उत्सव आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव (Ganpati Festival) आहे. तर तिकडे केरळमध्ये ओणम फेस्टिव्हलचा ( Onam Festival) उत्साह असतो. त्या या दोन्ही राज्यातील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दोन्ही महिन्यात मुदतीच्या आधीच पगार जमा होणार आहे. अर्थ विभागाने याबाबतचे आदेश संबंधित विभागांना दिला आहे.

उत्सवांना महत्व

अर्थ खात्याच्या (Finance Ministry) जावक विभागाच्या (Department of Expenditure) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार या दोन्ही राज्यातील सणांना खास महत्त्व देत आहे. त्यासाठी पगार आधीच जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पगार कधी जमा होणार?

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये पगार 19 ऑगस्ट 2021 रोजी जमा होईल. तर महाराष्ट्रात 18 सप्टेंबर रोजी पगार होईल. याशिवाय पेन्शनधारकांनाही याचा लाभ मिळेल.

संरक्षण, पोस्ट आणि दूरसंचार कर्मचाऱ्यांचाही समावेश

अर्थविभागानुसार, ज्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार मुदतीआधी येणार आहे, त्यामध्ये संरक्षण, पोस्ट आणि दूरसंचार कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

अॅडव्हान्स पगार

अर्थविभागानुसार, पगार अॅडव्हान्स पेमेंट म्हणून दिला जात आहे. त्याची अॅडजस्टमेंट ऑगस्ट आणि सप्टेंबमध्ये करण्यात येईल.

संबंधित बातम्या 

Gold Silver price today: सोन्याचा भाव वधारला, जाणून घ्या आजचा दर

Jan Dhan Account : तब्बल 6 कोटी जनधन अकाऊंट निष्क्रिय, तुमचं खातंही चेक करा!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.