AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol diesel price today : 18 जूनला पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की दिलासा ? घरातून निघण्यापूर्वी चेक करा रेट

Petrol- Diesel Price Today : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये फार दिलासा मिळालेला नसला तरी दरांवर नजर कायम आहे. जर तु्म्हीही आज टँक फुल करून घेणार असाल तर त्यापूर्वी आजच्या ताज्या दरावर एक नजर टाका.

Petrol diesel price today : 18 जूनला पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की दिलासा ? घरातून निघण्यापूर्वी चेक करा रेट
18 जून रोजी इंधनाचे दर किती ?
| Updated on: Jun 18, 2026 | 8:12 AM
Share

अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून चाललेला तणाव निवळत असल्याने जगाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. याच पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट झाली आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारातील या घसरणीचा आपल्याला काही फायदा होईल का, हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात प्रामुख्याने निर्माण झाला आहे. आज भारतात पेट्रोल – डिझेलचे दर कमी झालेत का ? असाही प्रश्न अनेकांना पडला. गुरूवार, 18 जून रोजी सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जारी केले आहेत. या तेल कंपन्यांनी देशांतर्गत बाजारात इंधनाचे दर बदललेले नाहीत.

कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण

फेब्रुवारी अमेरिका-इस्रायलने मिळून इराणवर हल्ला केल्यावर इराणनेही प्रत्युत्तर दिल आणि सुरू झाला अविरत संघर्ष, युद्ध. त्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास 50 टक्क्यांनी वाढ झाली होती, परंतु शांतता कराराची बातमी येताच त्यामध्ये एक टक्क्याहून अधिक घट झाली. गुरुवारी सकाळी ‘ब्रेंट क्रूड’चा भाव 1.04 टक्क्यांनी (0.83 डॉलर्स) घसरून 78.72 डॉलर्स प्रति बॅरलवर आला, तर ‘डब्ल्यूटीआय’ (WTI) क्रूडचा भावही 1.26 टक्क्यांनी घसरून 75.82 डॉलर्स प्रति बॅरल झाला.

तेल कंपन्यांना कोट्यवधींचं नुकसान

क्रूड ऑईलच्या किमतीत घट होऊनही भारतात इंधनाचे दर कमी झालेले नाहीत, त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे तेल कंपन्यांना होणारे प्रचंड नुकसान हे आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांच्या मते, सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर 3 रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर 27 रुपये, इतका तोटा अजूनही सहन करावा लागत आहे. परिणामी, या कंपन्यांना दररोज सुमारे 600 कोटी रुपयांचा तोटा होत आहे.

तरीही, दिलासादायक बाब म्हणजे 1 एप्रिल 2026 रोजी पेट्रोलवर हे नुकसान प्रति लिटर 24 रुपये आणि डिझेलसाठी प्रति लिटर 105 रुपये इतकं होते. 18 मे पर्यंत कंपन्यांचे दैनंदिन नुकसान 750 कोटी रुपयांच्या पातळीवर होते; आंतरराष्ट्रीय बाजारात किमती काहीशा कमी झाल्यामुळे या आकड्यात आता थोडी घट झाली आहे.

देशातील प्रमुख शहरातील आजचे पेट्रोल -डिझेलचे भाव

देशांतर्गत तेल कंपन्यांनी 18 जून 2026 साठी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. मोठ्या महानगरांपासून ते लहान शहरांपर्यंत सर्वच ठिकाणी हे दर स्थिर आहेत.

शहर पेट्रोलचे दर रुपये प्रति लीटर डिझेलचे दर रुपये प्रति लीटर
दिल्ली 102.12 95.20
कोलकाता 113.51 99.82
मुंबई 111.21 97.83
चेन्नई 107.77 99.55
नोएडा 102.12 97.56
चंदीगड 101.51 89.47
लखनऊ 101.89 95.36
पाटणा 113.37 99.36
रांची 105.26 100.49
भोपाळ 114.57 99.64

असे चेक करा तुमच्या शहरातील भाव

जर तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे लेटेस्ट दर घरबसल्या जाणून घ्यायचे असतील, तर तशी सुविधाही उपलब्ध आहे. इंडियन ऑईलचे ग्राहक 9224992249 या क्रमांकावर “RSP <city code>” असा एसएमएस (SMS) पाठवून दर जाणून घेऊ शकतात. तर, त्वरित माहिती मिळवण्यासाठी बीपीसीएल (BPCL) चे ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आणि एचपीसीएल (HPCL) चे ग्राहक 9222201122 या क्रमांकावर “HPPRICE <city code>” असा एसएमएस पाठवून इंधनाचे लेटेस्ट दर जाणून घेऊ शकतात.

Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...