AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Child Mutual Fund : मुलांचे भविष्य करा सुरक्षित! हे म्युच्युअल फंड आहेत ना

Child Mutual Fund : चाईल्ड म्युच्युअल फंड ही मुलांच्या भविष्यासाठी सर्वात चांगली गुंतवणूक योजना आहे. ही स्कीम लॉक-इन पीरियडसाटी असते. इक्विटी डेट आणि सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यात येते. हे म्युच्युअल फंड हायब्रिड म्युच्युअल फंड वर्गात मोडतात.

Child Mutual Fund : मुलांचे भविष्य करा सुरक्षित! हे म्युच्युअल फंड आहेत ना
| Updated on: Aug 27, 2023 | 3:59 PM
Share

नवी दिल्ली | 27 ऑगस्ट 2023 : प्रत्येक आई-वडिलांना मुलांच्या भविष्याची चिंता असते. मुलांच्या लग्नकार्यासाठी, उच्च शिक्षणासाठी मोठ्या रक्कमेची गरज असते. इतका पैसा जमविणे सोपे काम नसते. त्यासाठी मोठी रक्कम हाताशी असणे आवश्यक आहे. अवघ्या काही वर्षांत इतकी मोठी रक्कम जमा करणे सोपे नसते. त्यामुळे मुलांच्या बालपणीच त्यांच्या नावे चाईल्ड म्युच्युअल फंडात (Child Mutual Fund) केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरते. मुलांच्या भविष्यासाठी ही रक्कम उपयोगी ठरते. अनेक चाईल्ड म्युच्युअल फंड हे हायब्रिड म्युच्युअल फंडाच्या (Hybrid Mutual Fund) श्रेणीत मोडतात. पोर्टफोलियोच्या डायव्हर्सिफाईडसाठी डेट आणि बाँड तसेच सोन्यात पण गुंतवणूक करण्यात येते. या प्रकारच्या म्युच्युअल फंडात ‘कमी जोखीम अधिक परताव्याची’ हमी देण्यात येते. मुलांच्या शिक्षण आणि लग्नकार्यासाठी हा म्युच्युअल फंड उपयोगी ठरतो.

काय आहे चाईल्ड म्युच्युअल फंड?

चाईल्ड म्युच्युअल फंड हा एक प्रकारचा म्युच्युअल फंड आहे. यामध्ये मुलांच्या नावे खाते उघडता येते. या प्रकारच्या म्युच्युअल फंडात ‘कमी जोखीम अधिक परताव्याची’ हमी देण्यात येते. पोर्टफोलियोच्या डायव्हर्सिफाईडसाठी डेट आणि बाँड तसेच सोन्यात पण गुंतवणूक करण्यात येते. आतापासूनच लहान मुलांच्या नावे गुंतवणूक केल्यास भविष्यात त्यांच्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करता येते. अनेक चाईल्ड म्युच्युअल फंड हे हायब्रिड म्युच्युअल फंडाच्या श्रेणीत मोडतात.

गुंतवणुकीसाठी SIP हा चांगला पर्याय

चाईल्ड म्युच्युअल फंड हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरतो. त्यासाठी दरमहा तुम्ही एक ठराविक रक्कम एसआयपीच्या माध्यमातून गुंतवितात. या फंडात मुलांच्या नावेच गुंतवणूक करण्यात येते. काही म्युच्युअल फंडात लॉक इन पिरियड 5 वर्षांचा असतो. लहान मुलांच्या नावे पण म्युच्युअल फंड असतो. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना या फंडचे व्यवस्थापन करता येते. मुलांच्या नावे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरते.

चाईल्ड म्युच्युअल फंड योजना

देशातील जवळपास सर्वच एसेट मॅनेजमेंट कंपन्याकडे चाईल्ड म्युच्युअल फंड प्लॅन आहेत. यामध्ये युटीआय चिल्ड्रेंस करिअर फंड इन्व्हेस्टमेंट प्लॅन, टाटा यंग सिटिजन्स फंड, आयसीआयसीआय प्रू चाईल्ड केअर गिफ्ट प्लॅन आणि एचडीएफसी चिल्ड्रेंस गिफ्ट फंड आणि इतर अनेक कंपन्यांचे विविध म्युच्युअल फंड आहेत.

म्युच्युअल फंड काय आहे

म्युच्युअल फंड शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे एक माध्यम आहे. ज्या लोकांना शेअर बाजार कळत नाही. अथवा त्यातील बारकाव्यांचा अभ्यास नाही. तसेच ज्यांना जोखीम नको, ते म्युच्युअल फंडात गुंतवणूक करु शकतात. मोठ-मोठे फंड हाऊस गुंतवणूकदारांची रक्कम योग्य पद्धतीने विविध सेक्टरमधील शेअरमध्ये गुंतवितात. त्याआधारे नफा कमवितात आणि तो गुंतवणूकदारांमध्ये वाटतात. अर्थात म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पण बाजारातील जोखीम आधारीत असते.

लार्ज कॅप फंड्स फायद्याच

बाजारातील तज्ज्ञानुसार, लार्ज कॅप फंडात तुम्ही पैसा गुंतवू शकता. त्यामध्ये आतापर्यंत जोरदार रिटर्न मिळाले आहेत. गुंतवणूकदार मिडकॅप फंडमध्ये पैसा गुंतवू शकतात. इक्विटी फंड ही गुंतवणुकीसाठी योग्य. तर गुंतवणुकीतील काही हिस्सा डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतविता येईल.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.