AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Commercial LPG Price: आता हॉटेलमध्ये जावं का? खिशावर महागाईचा दरोडा, व्यावसायिक गॅसने बिघडवले गणित

Hotel and Restaurant Food Rate Hike: व्यावसायिक गॅसच्या किंमती एकाच झटक्यात 993 रुपयांनी वाढल्याने केवळ हॉटेलिंगच नाही तर खानावळीचे जेवणही महागणार आहे. त्यामुळे शिक्षण, नोकरीसाठी इतर शहरात राहणाऱ्यांना आता अजून कठीण दिवस येण्याची भीती व्यक्त होत आहे.

Commercial LPG Price: आता हॉटेलमध्ये जावं का? खिशावर महागाईचा दरोडा, व्यावसायिक गॅसने बिघडवले गणित
हॉटेलचे जेवण महागणारImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: May 02, 2026 | 11:11 AM
Share

Hotel and Restaurant Food Rate Hike: व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबा चालकांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. महागाईचा स्फोट झाला आहे. भाजीपाल्यापासून ते इतर घटकांपर्यंत अनेक वस्तू महागल्या आहेत. त्यात आता गॅसही महागल्याने हॉटेल चालकांपुढे व्यावसायिक संकट उभे ठाकले आहे. त्याचा भार आता ग्राहकांवर पडणार आहे. हॉटेलच्या विविध पदार्थांमध्ये 10 ते 15 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. ग्राहकांचा खिसा चांगलाच कापल्या जाणार आहे. सर्वसामान्यांना आता हॉटेलिंगच नाही तर स्ट्रीट फूडची चवही कडू लागणार आहे. तर उद्योग संघटना आणि हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनांनी या दरवाढीला कडाडून विरोध केला आहे. यामुळे अगोदरच हवालदिल झालेले अनेक चालक उद्योग बंद करत असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर काहींनी आता इंधनाला पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. पण हे पर्यायही महागडे असल्याने हॉटेल व्यावसायिक चिंतेत सापडले आहेत.

15 टक्के वाढीची शक्यता

फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष प्रदीप शेट्टी यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली. एलपीजीच्या दरवाढीमुळे आता खाद्यपदार्थांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. अन्नपदार्थांच्या किंमतीत 10 ते 15 टक्के वाढ निश्चित मानली जात आहे. पण तरीही चालकांच्या हाती फार काही लागणार नसल्याचे शे्टटी यांच्या म्हणणे आहे. केवळ हॉटेल व्यवसाय या वाढीने तग धरून असेल असे ते म्हणाले. 19 किलो वजनी व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत तीनदा एकूण 1,332.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यातील व्यत्यय, इतर पदार्थांची महागाई आणि ग्राहकांची संख्या रोडवली असताना आता अजून एक मोठे संकट हॉटेल व्यावसायिकांवर येऊन ठेपले आहे.

शेट्टी यांच्या मते, अनेक हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेलची वेळ मर्यादीत केली आहे. तर खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा कपात करण्यात आली आहे. गॅसला पर्याय शोधला जात आहे. काहींनी थेट चूल पेटवली आहे. पण हे सर्व पर्याय वेळखाऊ आणि खर्चिक आहेतच. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. काहींनी तर हॉटेल व्यावसाय तात्पुरता बंद केला आहे. तर काहींनी उपजीविकेसाठी दुसरा मार्ग निवडला आहे. रोजगार कमी झाला आहे. अनेक कामगार बेघर झाले आहेत. या इंडस्ट्रीवर इतका मोठा आघात झाला असताना आता सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात येत आहे.

एका फटक्यात 933 रुपयांनी महागले सिलेंडर

शुक्रवारी व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किंमतीत 993 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचा परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळ चालक, स्ट्रीट फूड व्हेंडर्स, कॅटरर्स, बेकरी आणि क्लाउड किचनला बसला आहे. यातील काहींनी तर व्यवसायाला रामराम ठोकला आहे. दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 3,071.50 रुपयांवर पोहचली आहे. गेल्या 6 महिन्यात 7 वेळा गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले.

Follow Us
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले