AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Rate Today : कच्चे तेल स्वस्त झाले, पण पेट्रोल-डिझेलच्या कपातीचे नाव नाही, आजचा भाव काय

Petrol Diesel Rate Today : कच्चे तेल गेल्या अनेक महिन्यांपासून स्वस्त असले तरी त्याचा कवडीभरही फायदा देशातील नागरिकांना मिळाला नाही. कच्चा तेलाचे भाव वधारले की ताबडतोब दरवाढ करणाऱ्या कंपन्यांवर अंकुश ठेवणार तरी कोण?

Petrol Diesel Rate Today : कच्चे तेल स्वस्त झाले, पण पेट्रोल-डिझेलच्या कपातीचे नाव नाही, आजचा भाव काय
तेल कंपन्यांची मनमानी
| Updated on: Jun 09, 2023 | 8:34 AM
Share

नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्चा तेलाचे भाव (Crude Oil Price) एका वर्षात कधीच 139 डॉलर प्रति बॅरलच्या घरात पोहचले नाही. या भावाने मध्यंतरी 90 डॉलर प्रति बॅरलचा टप्पा गाठला असला तरी अल्पावधीतच कच्चा तेलात घसरण झाली. कंपन्यांचा उरलासुरला सर्व तोटा, नुकसान भरुन निघाले आहे. या कंपन्यांनी मार्च महिन्याच्या तिमाहीत जोरदार कमाई केली आहे. भारतीय तेल उत्पादक आणि विपणन कंपन्या रशियाकडून स्वस्तात इंधन घेऊन त्याची युरोपातील राष्ट्रांमध्ये विक्री करत आहेत. त्याचा फायदा त्यांना मिळाला आहे. कच्चे तेल गेल्या अनेक महिन्यांपासून स्वस्त असले तरी त्याचा कवडीभरही फायदा देशातील नागरिकांना मिळाला नाही. पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Rate Today) कमी झाल्या नाहीत. कच्चा तेलाचे भाव वधारले की ताबडतोब दरवाढ करणाऱ्या कंपन्यांवर अंकुश ठेवणार तरी कोण?

अशी झाली घसरण जागतिक बाजारात कच्चा तेलाने जबरदस्त उसळी घेतली होती. कच्चे तेल 139 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. 2008 नंतर कच्चा तेलाची ही उच्चांकी उडी होती. जानेवारी 2023 मध्ये किंमती 80 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे सरकल्या होत्या. नंतर त्यात घसरण झाली. आंतरराष्ट्रीय जून 2017 पूर्वी इंधनाच्या किंमती दर 15 दिवसांनी अपडेट करण्यात येत होत्या. पण हा नियम बदलण्यात आला. आता रोज भावात बदल होतो.

13 महिन्यात दिलासा नाही कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण होऊन गेल्या 13 महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 22 मे 2022 रोजी पेट्रोलच्या किंमतीत कपात झाली होती. तेव्हापासून किंमतीत मोठा बदल झाला नाही. देशातील अनेक भागात पेट्रोल 100 रुपये प्रति लिटरवर पोहचले. तेल कंपन्या येत्या काही दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात होण्याची शक्यता आहे.

कच्चा तेलात घसरण आज कच्चा तेलात घसरण झाली. 9 जून रोजी ब्रेंट क्रूड ऑईल 75.72 डॉलर प्रति बॅरल तर डब्ल्यूटीआय ऑईल 70.97 डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाचे भाव (Crude Oil Price) हे गेल्या 15 महिन्यातील निच्चांकीस्तरावर आहेत.

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.40 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.53 तर डिझेल 93.04 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.44 तर डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 107.02 पेट्रोल आणि डिझेल 93.50 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 106.42 आणि डिझेल 92.94 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 107.45 आणि डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.25 तर डिझेल 93.74 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 107.89 तर डिझेल 94.38 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.72 रुपये आणि डिझेल 93.19 रुपये प्रति लिटर
  12. परभणी पेट्रोल 109.47 तर डिझेल 95.86 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 105.85 आणि डिझेल 92.37 रुपये प्रति लिटर
  14. रायगड पेट्रोलचा भाव 106.93 आणि डिझेल 92.39 रुपये प्रति लिटर
  15. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.77 रुपये तर डिझेल 93.29 रुपये प्रति लिटर
  16. ठाणे पेट्रोलचा दर 105.77 रुपये तर डिझेल 92.27 रुपये प्रति लिटर

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?