Petrol Diesel Price Today : परभणीसह राज्यात या शहरात पेट्रोल-डिझेल महाग, आज काय आहे इंधनाचा भाव

Petrol Diesel Price Today : जागतिक बाजारात कच्चा तेलात तेजी दिसून येत आहे. परभणीसह राज्यातील या शहरात पेट्रोल-डिझेल महाग झाले आहे. तुमच्या शहरातील भाव एका एसएमएसवर जाणून घेता येईल.

Petrol Diesel Price Today : परभणीसह राज्यात या शहरात पेट्रोल-डिझेल महाग, आज काय आहे इंधनाचा भाव
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 9:06 AM

नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्चे तेल तेजीत आहे. पण क्रूड ऑईलच्या (Crude Oil) किंमती भडकलेल्या नाहीत. ओपेक प्लस संघटनांनी कच्चा तेलाचे उत्पादन घटविण्याचा निर्णय एक महिन्यापूर्वी जाहीर केला होता. तसेच त्याची अंमलबजावणी मे महिन्यापासून करण्याची घोषणा केली होती. आता जवळपास अर्धा मे उलटणार आहे. पण या निर्णयाचे परिणाम जागतिक बाजारात दिसून आले नाहीत. भारताला सध्या रशिया आणि इराणकडून स्वस्तात इंधन मिळत आहे. पण या निर्णयाचा आयातीवर परिणाम दिसू शकतो. परभणीसह राज्यातील या शहरात पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price) महाग झाले आहे. तुमच्या शहरातील भाव एका एसएमएसवर जाणून घेता येईल.

कच्चा तेलाची किंमत आज 11 मे रोजी, डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 72.96 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 76.79 डॉलर प्रति बॅरल झाले.

मोठा बदल नाही केंद्र सरकारने 22 मे रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) कपात केली. त्यानंतर देशातील भाजपशासित राज्यांनी तोच कित्ता गिरवला. त्यांनी मूल्यवर्धीत करात कपात केली. त्यामुळे जनतेला एका लिटरमागे 10 ते 12 रुपयांचा फायदा तर झालाच. पण गेल्या एक वर्षात इंधनाच्या भावात कोणताही मोठा बदल झालेला नाही.

हे सुद्धा वाचा

प्रति लिटर इतका फायदा देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती गेल्या वर्षभरापासून मोठा फरक दिसलेला नाही. बाजारात तेलाच्या किंमतीत मामूली बदल दिसतो. जवळपास 345 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी तफावत दिसलेली नाही. एका अहवालानुसार, तेल कंपन्यांना प्रति लिटर 10 रुपयांपेक्षा जास्त नफा झाला आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.25 तर डिझेल 92.77 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.66 रुपये आणि डिझेल 93.19 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.61 तर डिझेल 94.11 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 107.62 पेट्रोल आणि डिझेल 94.08 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 107.33 आणि डिझेल 93.83 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.90 आणि डिझेल 93.42 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 106.86 तर डिझेल 93.37 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.24 तर डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.08 तर डिझेल 94.56 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.89 रुपये आणि डिझेल 93.38 रुपये प्रति लिटर
  12. परभणी पेट्रोल 109.41तर डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.99 आणि डिझेल 93.47 रुपये प्रति लिटर
  14. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.54 रुपये तर डिझेल 93.06 रुपये प्रति लिटर
  15. ठाणे पेट्रोलचा दर 106.49 रुपये तर डिझेल 94.45 रुपये प्रति लिटर

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.